प्रभाग रचनेबाबत अफवा पसरविणाऱ्यास कारवाई
प्रभाग रचनेबाबत अफवा पसरविणाऱ्यास कारवाई
महापालिका प्रशासनाचा इशारा
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही अत्यंत गोपनीयरित्या कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत सुरू आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून अजूनपर्यंत कोणतीही प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही; मात्र काही समाजघटकांनी विविध समाजमाध्यमांद्वारे कल्याण-डोंबिवली महापालिका, सार्वत्रिक निवडणूक संभाव्य प्रभाग रचना, असा मजकूर व्हायरल केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अफवा व गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
प्रसारित झालेला मजकूर हा पूर्णतः खोटा असून, त्याचा महापालिकेशी काहीही सबंध नाही. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमांद्वारे अथवा इतर मार्गाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रभाग रचनेसंदर्भात अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिला आहे.
राज्य सरकारने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या निवडणुकांसाठी महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश १० जून रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशात प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक तत्त्वे व नियम निश्चित केली आहेत. तसेच २३ जून रोजी प्रभाग रचनेबाबत सरकारने सुधारित कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार महापालिका स्तरावर ३१ जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचना मसुदा तयार करायचा आहे.
प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून सुनावणी
प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची प्रसिद्धी करायची आहे. नागरिकांच्या हरकती/सूचना २२ ते २८ ऑगस्टच्या दरम्यान मागविण्यात येणार आहेत. त्याला राज्यस्तरीय वर्तमानपत्र, राज्य सरकार महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट आणि महापालिका कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या कालावधीत आलेल्या हरकती/सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून सुनावणी घेण्यात येणार आहे. हरकती, सूचनावरील शिफारशी विचारात घेऊनच निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रभाग रचना अतिंम केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.