ठाण्यात एक लाख वाहनांना बसवली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

ठाण्यात एक लाख वाहनांना बसवली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

Published on

एक लाख वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट
१५ ऑगस्टनंतर होणार कारवाई

ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) ः प्रादेशिक परिवहनच्या एमएच चार कोडच्या एक लाख वाहनांना नव्या नियमानुसार नंबरप्लेट बसवण्यात आले आहेत. सोबतच परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल एक लाख ६८ हजार वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश असल्याने ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) या कामाला वेग आला आहे.
बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहने, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हायसिक्युरिटी नंबरप्लेट अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ४ डिसेंबर २०२४ रोजी शासनाने आदेश जारी केला असून, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागात प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम गतीने होत आहे. आतापर्यंत या कार्यालयात एक लाख जणांनी नंबर प्लेटमध्ये बदल करून घेतले. तर, एक लाख ६८ हजार जणांनी हा बदल करून घेण्यासाठी अर्ज केले असून एक लाख ४३ हजार वाहन धारकांना नंबर प्लेट बसवण्याकरिता वेळ दिली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

येथे करा लॉगिन :
१५ ऑगस्टनंतर हायसिक्युरिटी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हायसिक्युरिटी नंबरप्लेटसाठी ऑनलाईन अर्ज भरावा, त्याकरिता अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करावे, वाहनाचा तपशील भरावा, वेळ आणि केंद्र निवडून वेळ निश्चित करावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com