पंढरीच्या वारीमध्ये रक्‍तदानाची जनजागृती

पंढरीच्या वारीमध्ये रक्‍तदानाची जनजागृती

Published on

पंढरीच्या वारीमध्ये रक्‍तदानाची जनजागृती
मुंबई, ता. ३ ः भक्तीचा महासागर असलेल्या पंढरीच्या वारीमध्ये मुंबईतील काही तरुण एकत्र येत रक्‍तदानाबाबत जनजागृती करीत आहेत. पंढरपूर वारीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच ‘युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवार मुंबई’ या सामाजिक संस्थेने असा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हातात फलक, बॅनर आणि माहितीपत्रके घेऊन, वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी व इतर नागरिकांना रक्‍तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मोहिमेत संस्थेचे कार्यकारिणी सदस्य रामेश्वर खरुळे, सचिन निकम, मंदार नायक, हर्ष शिरसाट, सचिन धुरी, किरण पारसेकर, तेजस खरुळे यांनी सहभाग घेतला आहे. वारीच्या मार्गावर असंख्य वारकऱ्यांनी थांबून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि काहींनी स्वेच्छेने रक्तदानासाठी नोंदणीही केली. त्यातच एका ४० वेळा रक्तदान केलेल्या माउलीने रक्तदानावर भारूडसुद्धा सादर केले. गेल्या सात वर्षांपासून ही संस्था महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरे, थॅलेसेमिया जनजागृती आणि विविध आरोग्य उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com