झोपडपट्टीतील मुलांसाठी निःशुल्क वसतीगृह

झोपडपट्टीतील मुलांसाठी निःशुल्क वसतीगृह

Published on

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : खारघर येथील राहुल शिक्षण प्रसारक मंडळाने मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या, तसेच या प्रदेशातील प्रकल्पग्रस्त आणि कोकणातील ग्रामीण भागातील विशेषत: शेतमजूर, आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी खारघर, सीबीडी बेलापूर आणि तळोजा येथील विविध वसतिगृहांमध्ये निःशुल्क निवास व भोजन सुविधेची सोय केली आहे. याशिवाय संस्थेच्या विविध संशोधन केंद्रांद्वारे अल्पकालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही मोफत राबवले जात आहेत.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना केवळ दहावीनंतरचे कौशल्य, तांत्रिक, उद्योजकता व रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून, संस्थेचा हा उपक्रम कोणत्याही सरकारी अथवा खासगी निधीशिवाय, पूर्णतः स्वयंआधारित स्वरूपात राबविण्यात येत असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय संस्थेच्या विविध संशोधन केंद्राद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था, सम्राट अशोक संशोधन संस्था, राजश्री शाहू एआय प्रशिक्षण केंद्र आणि सत्याग्रह संशोधन केंद्र यांच्यामार्फत पाली भाषा, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता व उद्योजकतेसारख्या विषयांवर अल्पकालवधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही मोफत राबवले जात आहेत. सत्याग्रह महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रमही मोफत आहेत, विशेष म्हणजे, चवदार तळे सत्याग्रह शतकमहोत्सवी वर्ष लक्षात घेऊन संस्थेच्या व्यवस्थापन कोट्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीसह पदवी अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. डोंगरगावकर यांनी दिली आहे.
-----------------------
३० मुले, ५० मुलींना प्रवेश
सामाजिक व आर्थिक वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्रपणे उभे राहाता यावे, या उद्देशाने राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अशोक हॉस्टेल (सीबीडी बेलापूर), यशोधरा मुलींचे हॉस्टेल (खारघर) आणि सत्याग्रह हॉस्टेल (तळोजा) येथे ३० मुलींना आणि ५० मुलांना मोफत वसतिगृह व भोजनाची सोय दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com