टर्फ मैदाने बंद अथवा जमीनदोस्त

टर्फ मैदाने बंद अथवा जमीनदोस्त

Published on

टर्फ मैदाने बंद अथवा जमीनदोस्त 
ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः येऊर येथील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात उभारण्यात आलेली टर्फ मैदाने पाडण्यात अथवा बंद करण्यात आली असल्याचा दावा ठाणे महापालिकेने गुरुवारी (ता. ३) उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला. तसेच आणखी काही टर्फची मैदाने आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी हमीही महापालिकेने न्यायालयाला दिली. 
येऊरच्या जंगलात उभारण्यात आलेली नऊपैकी सात टर्फ मैदाने पाडण्यात आली असून उवर्रित दोन बंद केली आहेत. तसेच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहितीही ठाणे महापालिकेच्या वतीने वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला दिली. त्यावर आणखी दोन टर्फची मैदाने आढळून आल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंह यांनी मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली. त्याची दखल घेऊन ठाणे महापालिकेने एका आठवड्याच्या आत उवर्रित टर्फची मैदाने जमीनदोस्त करावी, याचिकाकर्त्यांना आढळून आलेल्या आणखी दोन टर्फच्या मैदानांवरही पालिकेने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश देऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.

प्रकरण काय ? 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १०३.८४ चौ. किलोमीटर मध्ये पसरले आहे. याच उद्यानाचा भाग असलेला ठाण्यातील येऊर परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून पर्यावरण, वन व हवा बदल मंत्रालयाने घोषित केले आहे. शून्य ते तीन किलोमीटर परिसरात कोणतेही हॉटेल, रिसॉट उभारण्यास मनाई असूनही येऊरमध्ये ५० विविध अनधिकृत बांधकामे ५ टर्फ मैदाने (पीच टर्फ क्लब, गुरुकुल क्रिकेट अॅकॅडमी, रंगोळी क्रिकेट फुटबॉल टर्फ १ व २ आणि विकिंग्स टर्फ) हॉटेल, बार, रिसॉट उभारली आहेत. टर्फ मैदानांवर मोठे दिवे लावून रात्रंदिवस खेळण्यासाठी तासानुसार पैसे मोजावे लागतात. मात्र, मोठे दिवे आणि गोंगाटामुळे वन्यजीव विचलित होत असल्याचा दावा ठाणेस्थित पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी याचिकेत केला होता.Ø

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com