मेफेड्रॉन विकणार्या एकास अटक
मेफेड्रोन विकणाऱ्या एकास अटक
दहशतवाद विरोधी पथकाची खारघरमध्ये कारवाई
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने गुरुवारी सायंकाळी खारघर सेक्टर-२ भागात सापळा लावून मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केली आहे. परवेज फिरोज मन्सूरी (३८) असे त्याचे नाव असून, त्याच्याजवळ सापडलेला एक लाख ४४ हजार रुपये किमतीचा ३६ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन जप्त केला आहे. आरोपीने ज्या व्यक्तीकडून मेफॅड्रॉन आणले, त्याचा दहशतवाद विरोधी पथकाकडून शोध सुरू आहे.
खारघर सेक्टर-२ मधील कोर्टयार्ड कॅफेजवळ एक व्यक्ती मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा शेंडगे व त्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी खारघरमधील कोर्ट यार्ड कॅफेजवळ सापळा लावला होता. या वेळी परवेज फिरोज मन्सूरी हा एका कारमधून संशयास्पदरीत्या फिरताना आढळला असता, दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. आरोपीने दोन सिगारेटच्या पाकिटात प्लॅस्टिक पिशवीत लपवून मेफेड्रोन (एमडी) आणल्याचे आढळले. पथकाने त्याच्याकडे सापडलेला एक लाख ४४ हजार रुपये किमतीचे ३६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त केले. परवेज फिरोज मन्सूरीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. परवेजने मालाड येथील रफिक नावाच्या व्यक्तीकडून हे मेफेड्रोन आणल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्यानुसार पथकाकडून त्याचाही शोध घेण्यात येत आहे.
सिगारेटच्या पाकिटात अमली पदार्थ
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीला पोलिसाचा संशय आल्याने त्याने अमली पदार्थ असलेले दोन्ही सिगारेटची पाकिटे रस्त्यालगत टाकून दिली होती. त्यामुळे कारवाईनंतर दहशतवाद विरोधी पथकाला आरोपीजवळ व त्याच्या कारमध्ये अमली पदार्थ सापडले नव्हते. पथकाने कसून चौकशी केल्यानंतर त्याने अमली पदार्थ असलेले सिगारेटचे दोन पाकिट रस्त्यालगत टाकल्याचे सांगितले. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने त्याला पुन्हा संबंधित ठिकाणी नेले असता, अमली पदार्थ असलेले दोन्ही सिगारेटचे पाकीट जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.