अत्याचार प्रकरणात आठजणांवर गुन्हा

अत्याचार प्रकरणात आठजणांवर गुन्हा

Published on

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर)ः घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला होता. या घटनेत पीडिता गर्भवती राहिल्याने आठ जणांविरोधात शांतिनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निजामपुरा हद्दीत राहणाऱ्या सुलताना सद्दाम दळवीने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला घरकामासाठी घरात राबवून घेतले आहे, तर विधी संघर्ष बालक आयान दळवीने प्रथम पीडितेला त्याच्या राहत्या घरी इच्छेविरुद्ध अत्याचार केला होता. त्यानंतर ३० मे रोजी रात्री ११ वाजता अरहान अन्सारी, आयान खान ऊर्फ टुंडा, दस्तगिर ऊर्फ पप्पु, हमजा दळवी, असान ऊर्फ चिंधी यांनी पीडितेला खेळण्याच्या बहाण्याने तिच्या घराच्या परिसरात असलेल्या गाळ्यात नेऊन विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता. ४) आठ जणांविरोधात शांतिनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com