करंदीकर महाविद्यालयात आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा

करंदीकर महाविद्यालयात आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा

Published on

बोर्डी (बातमीदार) : आषाढी एकादशीचे औचित्य साधून करंदीकर महाविद्यालयात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या टाळ नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्राध्यापकांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले आणि या दिवसाचे आध्यात्मिक पैलू अधोरेखित केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेश गायकर यांनी सादर केलेले सुमधुर भजन. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनाने उपस्थितांना भक्तिरसात लीन केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पराते गायकवाड यांनी केले होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com