सीवूड्समधील पाळणाघरासाठी मनसेकडून आंदोलनाचा इशारा
सीवूड्समधील पाळणाघरासाठी मनसेकडून आंदोलनाचा इशारा
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) ः सीवूड्स सेक्टर-४८ मध्ये बांधण्यात आलेले पाळणाघर सुरू करण्यासाठी मनसेकडून गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे, मात्र पाळणाघर सुरू न झाल्याने मनसेकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
येथील पाळणाघर सुरू व्हावे, यासाठी मनसेचे शहर कार्याध्यक्ष अमोल आयवळे यांनी वारंवार आयुक्त व उपायुक्त यांना पत्र दिले होते. त्यानंतर शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर पाळणाघर चालवण्यासाठी पॉलिसी बनवण्यात आली, चार वर्षे बंद असलेल्या पाळणाघराची दुरवस्था झाली होती; यासाठी १४ लाख रुपये दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले. यामध्ये मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी ग्रिल, वॉल, सीलिंग लिकेज अशा अनेक गोष्टी सुचवण्यात आल्या होत्या. दरम्यान, पाळणाघराची निविदा निघणार असताना, लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे पुन्हा सीवूड्सकरांचा पळणाघरासाठीचा वनवास सहा महिन्यांसाठी वाढला. अखेर महापालिका उपायुक्त यांच्याकडून आयवले यांना मागील वर्षी लेखी पत्राद्वारे निविदा प्रक्रिया प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र अद्यापही त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.