स्मार्ट प्रकल्पातून शेतीमालाला भाव
स्मार्ट प्रकल्पातून शेतीमालाला भाव
जिल्ह्यात चार उत्पादक कंपन्या कार्यरत; दोन कंपन्यांची उभारणी
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळवून मूल्यसाखळी उभारण्याच्या उद्देशाने राज्य शासानाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी विभागामार्फत रायगड जिल्ह्याकरिता १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. तर चार शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांची कर्ज उभारणीबाबत कार्यवाही सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या कृषीमालाला अनेक वेळा योग्य तो दर न मिळाल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याचबरोबर अवकाळी पाऊस, कीडरोग यामुळे नुकसानीचा धोका असतोच. काही शेतकरी कर्ज काढून आपली जमीन कसत असतो. मात्र त्यानंतर शेतीमालाला योग्य दर मिळत नाही. त्यातून आर्थिक नुकसान आणि मग हप्ते फेडण्यात अडचणी येतात. त्यामुळेच शासनाकडून स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उपप्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यात येते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपप्रकल्प मूल्याच्या ६० टक्के अनुदान स्मार्ट प्रकल्पांतर्गत देण्यात येते, तसेच उर्वरित ४० टक्के रक्कम ही शेतकरी उत्पादक कंपनीस स्वहिस्सा व कर्ज उभारणी करून करता येते. अशा उपप्रकल्पातून गोदाम, शीतगृह, पॅकहाउस, डाळ मिल, ऑइल मिल, औजारे, बँक प्रक्रिया उद्योग आदी पायाभूत सुविधा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत उभ्या केल्या जाणार आहेत. स्मार्ट प्रकल्प २०२० पासून सुरू करण्यात आल आहेत. या प्रकल्पाची कालमर्यादा २०२७ पर्यंत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. रायगड जिल्ह्याकरिता १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली असून, चार शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांची कर्ज उभारणीबाबत कार्यवाही सुरू आहे.
..............
चैकट:
स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजूर सीबीओंबाबत माहिती
१. सुखकर्ता ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., खालापूर
ए ग्रेड केळीची विक्री करणे तसेच पिकवणगृहाद्वारे केळी पिकवून फळविक्रेत्यांना विक्री करणे.
२. वनराई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि., पेण
-मिनी राइस मिलद्वारे तांदूळ तयार करून त्याद्वारे खाद्यतेल निर्मिती करून विक्री करणे.
३. आदिती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि., पेण
- भातावर प्रक्रिया करून विक्री करणे, मत्स्यखाद्य तयार करून विक्री करणे.
४. ज्ञानी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि., अलिबाग
-भातपिकावर प्रक्रिया करून तांदूळ विक्री करणे.
५. कुंडलिका कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि., मुरूड
- धान प्रक्रिया करून विक्री करणे.
६. मुरूड-जंजिरा शेतकरी उत्पादक कंपनी लि., मुरूड
- धान्यापासून पोहे तयार करून विक्री करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.