गुळसुंदेऐवजी आता वावेघर मतदारसंघ

गुळसुंदेऐवजी आता वावेघर मतदारसंघ
Published on

गुळसुंदेऐवजी आता वावेघर मतदारसंघ
पनवेल तालुक्‍यात गण, गटाची पुनर्रचना; जिल्‍हा परिषदेचे आठ तर पंचायत समितीचे १६ सदस्‍य


वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १५ (बातमीदार) ः जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभाग रचना सोमवारी (ता. १४) जाहीर करण्यात आली आहे. या वेळी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन गुळसुंदेऐवजी वावेघर जिल्हा परिषद गट आणि गण निर्माण करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास, लेखी स्वरूपात कारणांसह पनवेल तहसील कार्यालयात २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.
२०१७ च्या अगोदर पनवेल तालुक्यात १० जिल्हा परिषद गट होते, तर पंचायत समितीकरिता गणांची संख्या २० होती. जिल्ह्याचा विचार करता फक्त पनवेलमधूनच दोन आकडी सदस्य निवडून जायचे.
या तालुक्याचा स्‍थानिक राजकारणावरून रायगड जिल्‍हा परिषदेची सत्ता ठरत होती. शेतकरी कामगार पक्षाने पनवेलवरून अलिबागकरांना बळ दिल्याचा इतिहास आहे. ऑगस्ट २०१६ ला पनवेल महापालिकेची स्थापना झाल्याने २३ ग्रामपंचायती विसर्जित होऊन त्यांचे महापालिकेत विलीनीकरण करण्यात आले. त्यामुळे गट व गणाची संख्या अनुक्रमे आठ आणि १६ वर आली. २०२२ ला वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटांची संख्या नऊवर पोहोचली होती, तर वावेघर गटाची नव्याने निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे दोन पंचायत समिती गण वाढले.
आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद गण व गटांचे प्रारूप तयार करण्यात आले. रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडून नवी रचना जाहीर केली. पनवेल तालुक्यातील गुळसुंदे हा मतदारसंघात वावेघर गट आणि गण निर्माण करण्यात आला आहे.

गट आणि गणाचा बदल टळला!
गुळसुंदेऐवजी वावेघर हा नवीन मतदारसंघ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी करण्यात आला आहे. हा बदल वगळता इतर ठिकाणी ग्रामपंचायतींमधील गाव त्याच मतदारसंघात ठेवण्यात आले आहेत. एकंदरीतच गट आणि गणांमधील गावांचा बदल टाळण्यात आला आहे.

पनवेल पंचायत समिती गण
वावंजे, चिंध्रण, नेरे, आदई, पालीदेवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, वावेघर, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे, आपटा.

चौकट
तालुक्यातील गट
वावंजे,नेरे, पालीदेवद, पळस्पे वावेघर, वडघर, गव्हाण, केळवणे.

लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन गुळसुंदेऐवजी वावेघर जिल्हा परिषद गट आणि गण निर्माण करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणालाही काही हरकती अथवा सूचना असल्यास, ती लेखी स्वरूपात, कारणांसह पनवेल तहसीलदार यांच्याकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावी, त्यानंतर आलेल्या सूचनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- विजय पाटील, तहसीलदार, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com