मुंबई
व्यसनमुक्त देशासाठी अंधेरीत प्रतिज्ञा
मालाड (बातमीदार)ः देशात व्यसनमुक्तीसाठी एकता मंच विविध माध्यमांतून अमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात जागरूकता मोहीम राबवते. याच अनुषंगाने अजय कौल यांच्या नेतृत्वाखाली अंधेरीत पदयात्रा काढण्यात आली. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. चाचा नेहरू पार्क ते यारी रोड चिल्ड्रन वेल्फेअर ऑर्किड इंटरनॅशनल सेंटरपर्यंत एक भव्य जागरूकता पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत तीन हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमृता फडणवीस, खासदार रवींद्र वायकर, आमदार हारून खान, अमित साटम, संजय पांडे, फिल्म अभिनेता चंकी पांडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.