तीन महिने आधीच बहरली सप्तपर्णी
तीन महिने आधीच बहरली सप्तपर्णी
हवामानात असमतोलाचे संकेत
ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात उमलणारी सप्तपर्णी तीन महिने आधीच उमलल्याचे ठाण्यात दिसून आले आहे. हिवाळ्यात रात्रीच्यावेळी मंद सुगंध पसरणारा फुलांचा सुगंध आता पावसाच्या हंगामात मिळत आहे; मात्र निसर्ग नियमात होणाऱ्या ता बदलाकडे वृक्ष, पर्यावरण अभ्यासक गांभीर्याने पाहू लागले आहेत. काहींच्या मते हा हवामानातील असंतुलनाचा इशारादेखील आहे.
सप्तपर्णी बहरण्याचा मोसम ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीचा असतो. या झाडांची फुले हिरवट-पांढऱ्या रंगाची असतात. त्यांचा विशिष्ट पद्धतीचा सुगंध संध्याकाळी व रात्री झाडाच्या परिसरात दरवळतो. या झाडाच्या फांदीला एका ठिकाणी सात पाने येतात. त्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे. ठाणे महापालिकेकडून उद्याने, रस्त्याच्याकडेला, शासकीय कार्यालय पारिसरात सप्तपर्णी लावले आहेत. अनेक सोसायट्यांनीसुद्धा त्यांची लागवड केलेली आहे. हिवाळाच्या मोसमात झाडांना बारीक फुलांचे गुच्छ येऊन त्यांचा सुगंध सर्वत्र पसरतो. झाडांना आलेली फुले आणि पसरलेला सुगंध लक्षात येताच हिवाळा आल्याची लोकांना चाहूल लागते; मात्र यंदा या झाडांच्या बहरण्याची वेळ चुकलेली आहे. पावसाच्या दिवसांत जुलैमध्ये झाडांना फुले आले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमिंकडून आश्चर्य आणि चिंताही व्यक्त होत आहे.
पर्यावरण अभ्यासकांनी या घटनेचा अभ्यास करताना यामागे हवामानातील अनियमितता, तापमानातील चढ-उतार आणि ऋतूचक्रातील गोंधळ हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. वृक्ष शास्त्रज्ञांच्या मते, झाडांना फुलण्यासाठी विशिष्ट तापमान, आर्द्रता आणि प्रकाशमान आवश्यक असते; मात्र गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान बदलामुळे या घटकांमध्ये असमान बदल होत आहेत. त्यामुळे झाडांचे नैसर्गिक वेळापत्रक ढासळत असल्याची माहिती ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी दिले.
हवामान बदलाचा परिणाम केवळ झाडांपुरता मर्यादित राहात नाही, तर पक्षी, कीटक आणि परागकण वाहून नेणाऱ्या प्रजातींच्या जीवनचक्रावरही त्याचा थेट परिणाम होतो. कारण सप्तपर्णीची फुले आणि त्यावर अवलंबून असणारे कीटक हे एकमेकांशी जैविक दृष्टिकोनातून जोडलेले असतात. जर फुले लवकर उमलली, तर कीटकांची वेळ साधली नाही आणि त्यामुळे संपूर्ण पर्यावरणीय साखळीच विस्कळित होऊ शकते.
डॉ. नागेश टेकाळे, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.