विकासमार्गाला‘निधी’चणचण

विकासमार्गाला‘निधी’चणचण

Published on

विकासमार्गाला ‘निधी’ची चणचण

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : रायगड जिल्ह्यात विरार-अलिबाग बहुद्देशीय कॉरिडॉरसाठी ५९३ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त २२ टक्के भूसंपादन झालेले आहे. शासनाकडून ३,४४७ कोटींचे वाटप केले आहे. पण निधी नसल्याने भूसंपादनाचे काम वर्षभरापासून ठप्प आहे. महामुंबईच्या दळणवळणात क्रांतिकारी ठरणाऱ्या महामार्गाला निधीची चणचण लागल्याचे चित्र आहे.
पेण तालुक्यातील आठ गावांमधील ११५ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. यातील जिते गाव वगळून अन्य गावातील शेतकऱ्यांनी भूसंपादनास तीव्र विरोध केला आहे. जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला दर सबंधित शेतकऱ्यांना मान्य नाही, तर पनवेल तालुक्यातील ३२ हेक्टरचे निवाडे शिल्लक आहेत. निधीअभावी पुढील कार्यवाही करता येत नसल्याने अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पनवेल मेट्रोसेंटर-१ चे भूसंपादन अधिकारी जनार्दन कासार यांच्या म्हणण्यानुसार निधीच आलेला नसल्याने पुढील संपादन प्रक्रिया करता येत नाही. निधी मिळवण्याचे प्रयत्न असून, त्यानंतरच भूसंपादन सुरू करता येईल. तसेच शेतकरी आता चालू दरानुसार मोबदला देण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.
---------------------------------------
- एमएमआरडीए क्षेत्रातील वसई, भिवंडी, कल्याण आणि पेण परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसीसह वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल महानगरे, जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ यांच्या विकासात हा मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे.
- भूसंपादनासाठी राज्य शासनाने २२,२५० कोटींचे हुडकोकडून कर्ज घेण्यास हमी घेण्यात आली आहे, मात्र कर्जाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने भूसंपादनाचे काम पुढे सरकु शकलेले नाही. यामुळे हा कॉरीडॉर लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
-------
विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिका सद्यःस्थिती
रायगड जिल्ह्यातील एकूण गावे - ६३
संपादित करावयाचे क्षेत्र - ५९३ हेक्टर २३
संपादन केलेले क्षेत्र - १३० हेक्टर
संपादन करावयाचे क्षेत्र - ४६२ हेक्टर
वाटप मोबदला - ३४४७ कोटी
शिल्लक रक्कम - ४.५७ कोटी
-----
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
एकूण लांबी: १२६ किमी
मार्गिकेची संख्या : ८ ते १४ लेन (३.७५ मीटर रुंदीच्या लेन)
अंदाजित खर्च : अंदाजे ५५,००० ते ६६,००० कोटी रुपये
-----
प्रकल्पाचे टप्पे
* पहिला टप्पा: नवघर (पालघर) ते बालावली (पेण, रायगड) पर्यंत ९६.४१ किमी.
* दुसरा टप्पा : बालावली ते अलिबागपर्यंत २९.९ किमी.
* अपेक्षित पूर्णत्वाची तारीख : २०३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com