नवी मुंबईच्या रिक्षांची जालनात विक्री

नवी मुंबईच्या रिक्षांची जालनात विक्री

Published on

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : नवी मुंबईतून चोरलेली रिक्षा जालना जिल्ह्यामध्ये विक्री केली जात होती. या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, नवी मुंबईच्या विविध भागांतील चोरलेल्या १२ रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
सीबीडी सेक्टर ११ मधून २८ मे रोजी रिक्षा चोरीला गेल्याचा गुन्हा सीबीडी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ६० ते ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघे संशयित आरोपी निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी नाजिमोद्दीन काझी (४३) याला जालना जिल्ह्यातील परतूर येथून अटक केली. सखोल चौकशीत त्याचा साथीदार साकीब शेखला (२४) जालना येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांनी सीबीडी, खारघर, कळंबोली, पनवेल परिसरातून १२ ऑटो रिक्षा चोरल्याची कबुली दिली. तसेच या रिक्षांवरील चेसी नंबर बदलून त्यांची विक्री केल्याचे तपासात सांगितले.
---------------------------
विभाग चोरलेल्या रिक्षा
सीबीडी पोलिस ठाणे - ३
खारघर, कळंबोलीतील - ४
पनवेल शहर - १
एकूण चोरीचे गुन्हे - ८
----------------------------------------
कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास
नवी मुंबईतून चोरलेल्या १२ रिक्षा जालन्यातील परतूर, मंठा तसेच हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून हस्तगत केल्या. या गुन्ह्यातील रिक्षांचे आरटीओ नोंदणी क्रमांक, इंजिन नंबर, चेसी नंबर मिटवल्याने त्यांची ओळख पटवणे अत्यंत जिकिरीचे होते. दरम्यान, सीबीडी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून रिक्षांची ओळख पटवून गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com