खिंडी पाड्यातील रहिवाशांना पूर्वसनाची प्रतीक्षा
खिंडीपाड्यातील रहिवाशांना पुनर्वसनाची प्रतीक्षा
जीवन तांबे : सकाळ वृत्त
चेंबुर, ता. २६ : भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात अर्धवट संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. परिणामी निर्मळनगरमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या परिसरात त्वरित आरसीसी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अन्यथा आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
मुंबई उपनगरात गेल्या अनेक वर्षांपासून दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. मंगळवारी (ता. २२) मुसळधार पावसामुळे खिंडीपाड्यातील निर्मळनगर येथील संरक्षक भिंत कोसळल्याने सात घरांचे नुकसान झाले. या परिसरातील धोकादायक घरांतील कुटुंबीयांना जवळच स्थलांतरित केले आहे. भांडुपमधील खिंडीपाडा, गांवदेवी, श्रीरामनगर, नरदासनगर, हनुमान टेकडी, रावते कम्पाउंड, आंब्याची भरणी अशोक टेकडी, सोलापूर दर्गा हा डोंगराळ भाग धोकादायक मानला जातो. या परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे दरड कोसळण्याची व नाल्याला पूर येऊन एखादी दुर्घटना घडू शकते.
पावसाळ्यात यापूर्वी गावदेवी व श्रीरामनगर, खिंडीपाड्यात कित्येकदा दरड कोळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळा जवळ आला की पालिकेचा एस विभाग व जिल्हा अधिकारी घरावर नोटीस चिकटवून जातात; मात्र पुनर्वसन करीत नाहीत, अशी तक्रार रहिवाशांची आहे. खिंडीपाड्यातील काही ठिकाणी म्हाडातर्फे दगडाची संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी निधी अपुरा पडल्याने संरक्षक भिंतीचे काम अर्धवट आहे. यापूर्वी म्हाडाकडून बांधलेल्या संरक्षक भिंतीची अवस्था खूपच वाईट आहे. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरातील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.
दगडाच्या संरक्षक भिंतीऐवजी आरसीसी संरक्षक भिंत बांधण्यात यावी तसेच निधीअभावी रखडलेल्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. गटारातून वाहणारे डोंगरावरील पाणी भिंतीवर येते तसेच झुडपे जीर्ण संरक्षण भिंतीवर उगवतात. त्यामुळे भिंती पोखरून भुसभुशीत होतात. परिणामी परिसरात दुर्घटना घडतात. स्थानिक प्रतिनिधी, पालिका व म्हाडा अधिकारी सर्रासपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या घटना घडण्यास तेच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मंगळवारी दरड कोसल्याची घटना माझ्या डोळ्यासमोर घडली. तेव्हा मुलांना घेऊन घराबाहेर गेले म्हणून थोडक्यात बचावलो. १०-२० वर्षांपासून आम्हाला संरक्षण भिंत बांधून द्या, असे निवेदन देत आहोत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आमच्या जीवाशी खेळत आहे, अशी खंत स्थानिक रहिवासी सरिता उतेकर यांनी व्यक्त केली.
........................................
तीन वर्षांपासून या परिसरात राहत आहे. अद्याप संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. मुसळधार पाऊस पडला की रात्र जागून काढतो. दरड कोसळली तरी कुणी आमचे कायमस्वरूपी पुर्नवसन करीत नाही की संरक्षक भीत बांधून देत नाहीत. प्रशासन आमचा जीव जाण्याची वाट पाहात आहे.
- वाळू चव्हाण, स्थानिक रहिवासी
दहा वर्षांपासून सरकारला निवेदन देणे सुरू आहे, पण आमचे कोणी ऐकत नाही. आम्हाला लवकरात लवकर नवीन संरक्षण भिंत बांधून द्या.
- कमला प्रसाद निषाद, रहिवासी
........................................
संरक्षण भिंत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे दरड कोसळत आहेत. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे ही भिंत कोसळली. आम्ही प्रशासनाच्या मदतीने पीडित लोकांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले आहे. नवीन संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
- मानसी सावंत, शिवसैनिक शिंदे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.