सेंट्रल पार्क ची दुरावस्था,
खारघर सेंट्रल पार्कची दुरवस्था
निसरड्या रस्त्यांमुळे ज्येष्ठ नागरिक अपघातग्रस्त; व्यवस्थापनाविरोधात तक्रार
खारघर, ता. २६ (बातमीदार) ः खारघरमधील सिडकोने विकसित केलेले सेंट्रल पार्क हे शहराचे हरित हृदय मानले जाते; परंतु सध्या या उद्यानाची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, योगा पार्ककडे जाणारा रस्ता निसरडा झाल्याने ज्येष्ठ नागरिक अपघातग्रस्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर खारघरमधील ७२ वर्षीय निवृत्त नौदल कमांडरने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून उद्यानाच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधले आहे.
बुधवारी (ता. १६) कमांडर यांच्या पत्नी योगा पॉइंटकडे जाताना पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आमच्यासारखे अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज येथे फिरण्यासाठी येतात; पण सिडकोने देखभाल व स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने सेंट्रल पार्क आता धोकादायक बनले आहे, असे कमांडर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. सेंट्रल पार्क सध्या समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. पावसामुळे रस्त्यावर गाळ साचतो आहे; मात्र हाउसकिपिंग कर्मचारी सफाई करताना दिसून येत नाही. बाके मोडकळीस आले असून, गवत वाढले आहे. त्यामुळे वृद्धांसाठी चालणे धोक्याचे झाले आहे. तसेच थीम पार्कमधील कलाकृतींची तोडफोड, तसेच शौचालयांची दुरवस्था लक्ष वेधत आहे.
...............
सिडकोकडून दुर्लक्ष, भाजपचा पुढाकार
या समस्यांवर भाजपचे जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की सेंट्रल पार्कमध्ये लोकसंगीताची माहिती देणाऱ्या थीम पार्कची दुरवस्था झाली आहे. योगा व ध्यान पार्कमधील सोयी मोडकळीस आल्या आहेत. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन समस्या मांडणार आहोत.
....................
सिडकोने या गोष्टींकडे लक्ष द्यावे :
निसरड्या रस्त्यांची दुरुस्ती
पावसाळी काळातील गाळ काढण्याची नियमित व्यवस्था
बाके, शौचालये व थीम पार्कची तातडीने दुरुस्ती
सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.