पट्टा
केडीएमसीचे अभियंता विजयकुमार विसपुते यांचा गौरव
डोंबिवली (बातमीदार) ः कल्याण डोंबिवली महापालिकेचे उप अभियंता विजकुमार विसपुते यांचा सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला नेहरू रोड बचाव संघर्ष समितीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. डोंबिवली सारस्वत कॉलनी येथे या सोहळ्याचे आयोजन केले होते. डोंबिवली भूषण, पद्मश्री गजानन माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विजकुमार विसपुते यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महापालिका कार्यकारी अभियंता मनोज सांगवे, त्यांचे सहकारी अवधूत मदन आणि नाख्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले आणि आभारप्रदर्शन मृदुला कुलकर्णी यांनी केले. या वेळी प्रभाकरन, इंगवले, जंगम, निषाद पाटील, श्रुती उरणकर आणि इतर महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
****
ठाकरे गटाच्या वतीने शाडूची मूर्ती बनविण्याची कार्यशाळा
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : शिवसेना कल्याण पश्चिम पारनाका विभागाच्या वतीने सालाबादाप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाडूचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत सुमारे ५५ इच्छुकांनी सहभाग घेत शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या.
या कार्यक्रमास शिवसेना माजी शहरप्रमुख सचिन बासरे, कल्याण शहरप्रमुख बाळा परब, माजी शिक्षण समिती अध्यक्ष प्रा. उदय सामंत, मूर्तिकार शिल्पकार प्रशांत गोडांबे, शेखर इश्वाद, मीनल लेले, विकास पाटील, संतोष पष्टे, उपजिल्हा संघटक सुनीता लेकावले, महिला संघटिका मीनल कांबळी, सोनाली पष्टे, उप शहरसंघटक सुभाष पेणकर, ज्येष्ठ शिवसैनिक विजय ढोले, विभाग संघटक वैभव हरदास, प्रवीण कबाडी, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रथमेश पुण्यार्थी, मोहन पिंपळखरे व बिग बॉस कलाकार संतोष चौधरी ऊर्फ दादूस हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना उप शहरप्रमुख दिनेश शेटे, सारंग केळकर, शाखाप्रमुख पंकज माने, शाखा संघटक अश्विनी नाडकर, प्रफुल लांडगे, अमित गोरे, विकास कुलकर्णी, आदित्य फडे, संतोष पष्टे, गजेंद्र ताम्हणे यांनी मोलाचे सहकार्य केले.
*****
मनशक्तीच्या वतीने मेंदूक्रांती कार्यशाळा
कल्याण (वार्ताहर) : बालवयातील मुलांच्या पालकांसाठी पालकत्वाला आनंददायी व योग्य दिशा देणारी मार्गदर्शक मेंदूक्रांती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मनशक्तीच्या कल्याण केंद्राच्या वतीने रविवारी (ता. ३) सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत कल्याण पश्चिमेतील गांधी चौक ब्राह्मणसभा पंडित वाडी या ठिकाणी आयोजित केली आहे.
या कार्यशाळेत मुलामुलींच्या बुद्धिमत्तेला चालना कशी द्यावी, वर्तनविषयक प्रश्न कसे हाताळावेत, मोबाईलपासून मुलांना लांब कसे ठेवावे, मुलांचा सर्वांगीण विकास कसा करावा, मुलांच्या झोपेचा उपयोग वर्तनात्मक विकासासाठी कसा करावा यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यशाळेत मिळतील. ही कार्यशाळा सर्वांसाठीच उपयुक्त असून, अधिक माहितीसाठी संपर्क ९८३३११०३२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून केले आहे.
***
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.