बीएसएनएलची चारोटीतील इमारत जीर्ण अवस्थेत
बीएसएनएलची इमारत जीर्ण अवस्थेत
चारोटीत कर्मचारी कमतरतेमुळे अडचणी वाढल्या
कासा, ता. ३० (बातमीदार) ः कधी काळी देशातील एकमेव सरकारी दूरसंचार सेवा पुरवठादार म्हणून लाखो ग्राहकांची पसंती असलेल्या बीएसएनएलची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. खासगी कंपन्यांनी बाजारात आक्रमक पद्धतीने प्रवेश करीत ग्राहकांना आपल्याकडे वळवले आहे. यामुळे बीएसएनएलमधील कर्मचारी कमतरता भासत असून, इमारतीची अवस्था जीर्ण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बीएसएनएलची सेवा पूर्वीप्रमाणे प्रभावी राहिलेली नाही. विशेषतः ग्रामीण भागात टॉवर सिग्नल कमजोर असून, यामुळे नेटवर्कसंबंधी तक्रारी वाढत आहेत. ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी होत असूनही बीएसएनएलकडून अपेक्षित सेवा मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. गावागावातील अनेक सरकारी कार्यालये, बँका, पोस्ट ऑफिसमध्ये अजूनही बीएसएनएलची फायबर टू होम किंवा मोबाईल सेवा कार्यरत आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मेंटेनन्स व नियमित सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे गाणं तालुक्यातील चारोटी येथे बीएसएनएलची एक मोठी बहुमजली इमारत असून, ती सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. साफसफाई न झाल्याने इमारतीची अवस्था भूत बंगल्यासारखी झाली आहे.
यासंदर्भात बीएसएनएलचे पालघर विभागाचे अधिकारी के. के. जोशी यांनी सांगितले, की चारोटी येथील इमारतीत कर्मचारी नसल्यामुळे नियमित स्वच्छतेचा अभाव आहे. मात्र तिथे सेवा सुरू असून लवकरच त्या इमारतीची स्वच्छता केली जाणार आहे. तरीही शहरी भागात बीएसएनएलकडून नव्या योजना राबवल्या जात आहेत. घरपोच सिम कार्ड पोहोचवण्याची सेवा सुरू झाली असून, ग्राहक घरी बसून आपले सिम पोर्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. त्यामुळे बीएसएनएल पुन्हा एकदा ग्राहकांचा विश्वास मिळवण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकेकाळी बीएसएनएलचे सिम वापरणे हा अभिमानाचा विषय मानला जात होता. मात्र आजच्या स्पर्धात्मक युगात खासगी कंपन्यांच्या प्रभावी सेवा आणि योजनांमुळे बीएसएनएलकडून ग्राहक दूर गेल्याचे चित्र आहे. तरीही ग्रामीण भागात जर बीएसएनएलने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले असून जुने ग्राहक परत येऊ शकतात, असे मत ग्राहक प्रसाद वेलणकर यांनी व्यक्त केले.
फोटो..
बीएसएनएल चारोटी येथील इमारत.
प्रसाद वेलणकर बीएसएनएल ग्राहक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.