पारंपरिक खण कापडाला कलात्मकतेची झळाळी
पारंपरिक खण कापडाला कलात्मकतेची झळाळी
खणाचा फेटा, शाही आसन आणि पारंपरिक गादीला मागणी
गायत्री ठाकूर : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० (बातमीदार) : पारंपरिक खणाचे कापड पूर्वी फक्त साड्यांपुरते मर्यादित होते, मात्र सध्याच्या काळात या कापडाला नव्या स्वरूपात, आकर्षक रंगसंगतीत आणि आधुनिक डिझाइन्समध्ये सादर करून त्याला एक नवा ट्रेंड मिळाला आहे. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे बाजारात सजावटीच्या वस्तूंना विशेष मागणी असते. यंदा खण कापडापासून तयार केलेले फेटे, आसने, चौरंग कवर, उश्या आणि सजावटीच्या वस्तू विशेष आकर्षण ठरत आहेत.
डोंबिवली येथील नंदा मगदूम या गृहिणीने गेल्या चार वर्षांपासून पारंपरिक खणाच्या कापडातून विविध हस्तकलेची उत्पादने तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांची मुलगी अदिती मगदूमदेखील या व्यवसायात त्यांच्यासोबत आहे. सुरुवातीला या वस्तूंना फारशी मागणी नव्हती, असे त्या सांगतात, पण आता खणाच्या कापडातून तयार केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. खण म्हणजे एक प्रकारचे खास कापड, जे सामान्यतः महिलांच्या पारंपरिक पोशाखात वापरले जाते, विशेषतः नवरीच्या साड्या, झुबके किंवा पारंपरिक ब्लाऊज बनवण्यासाठी वापरला जातो.
खणाचे कापड याची वैशिष्ट्ये :
रंगीत व सुशोभित डिझाइन : खणावर बऱ्याच वेळा फुलांचे, मोराचे किंवा पारंपरिक डिझाइन्स असतात.
मऊसूत पण मजबूत: खणाचे कापड सामान्यतः सूट आणि कॉटन मिश्रित असते, जे मऊ पण टिकाऊ असते.
पारंपरिक वापर : पूर्वीच्या काळात खणाचे कपडे लग्नात, सणासुदीला किंवा नित्य परिधानासाठी वापरले जात.
खणाचे काही प्रकार :
नारळी-पाखराचा खण
जरीच्या काठाचा खण
छोट्या-बुटक्यांचा खण
उपलब्ध उत्पादने :
गादीवाली आसने – पारंपरिक गादी आणि उशांचा सुंदर सेट
शाही पद्धतीची आसने – मोठ्या गणपती मूर्तींसाठी खास डिझाइन
टोपी, फेटे – खण कापडापासून तयार केलेले रंगीबेरंगी पारंपरिक फेटे
चौरंग कवर – भरजरी नक्षीकाम, विविध रंगसंगती आणि रेशमी काठ्यांवर फ्रिंजेस
प्रकार किंमत
चौरंग कव्हर १४९९
बॅकड्रॉप १४९९
फेटा ४९९
शेला ३९९
गादी ७९९
कमल साधा आसन ९९९
कलम फुल आसन १४९९
गणपती रांगोळी ९९९
टोपी ५५०
तोरण ८५० ते ९५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.