शाळकरी मुलांना गेमिंगचे व्यसन

शाळकरी मुलांना गेमिंगचे व्यसन

Published on

शाळकरी मुलांना गेमिंगचे व्यसन
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : शाळेला दांडी मारून विद्यार्थी गेमिंग पार्लरमध्ये खेळण्यासाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चिंताग्रस्त पालकांची तक्रार मिळाल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा उचलत थेट गेमिंग पार्लरला धडक देत चालकांची कानउघाडणी केली. शाळेच्या गणवेशात मुले गेम झोनमध्ये पुन्हा दिसल्यास गेम झोन फोडून टाकण्याचा इशाराही मनसेने पार्लरचालकांना दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कलजवळील एका खासगी पार्लरमध्ये मोठ्या स्क्रीन, रंगीबेरंगी लाइट्स, आरामदायक आसनव्यवस्था आणि फूड पॅकेट्ससह सर्व सोयी उपलब्ध आहेत. यामुळे शाळकरी मुले आकर्षित होत आहेत. पालकांच्या माहितीनुसार काही विद्यार्थी घरातून पैसे चोरण्यापासून ते साठवलेल्या पैशांचा वापर करून गेम खेळतात. येथे मिनिटे व तासानुसार ४५ रुपयांपासून पैसे आकारले जातात. मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की पालकांच्या तक्रारीनंतर त्यांनी गेमिंग पार्लरमध्ये भेट देऊन स्पष्ट इशारा दिला आहे. शहरातील अनेक गेमिंग पार्लरवरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पालकांच्या मते घरातून पैसे चोरणे, अभ्यासावर परिणाम होणे आणि व्यसन वाढणे चिंताजनक बाब आहे.

कल्याण पश्चिमेतील एका खासगी गेम झोनमध्ये हा प्रकार घडला आहे. येथील मोठमोठ्या स्क्रीन्स, डोळे दिपवणाऱ्या रंगबेरंगी लाइट्स, उत्तम आसनव्यवस्था व गरज भासल्यास फूड पॅकेट्स अशी सर्व व्यवस्था असलेले वातावरण शाळकरी मुलांना भुरळ घालत आहे. गेम झोनमधील प्ले स्टेशनवरील विविध खेळ तसेच व्हीआर बॉक्सद्वारे आभासी दुनियेत जाण्यासाठी घरातून पैसे चोरून आणण्याचे धक्कादायक कृत्यदेखील विद्यार्थी करीत असल्याचे पालकांकडून आम्हाला सांगण्यात आल्याचे या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

घरातून पैसे मिळत नाही म्हणून शाळकरी मुले साठवलेल्या पैशांचा गल्ला फोडून गेम खेळण्यासाठी पैसे नेतात ही बाब धक्कादायक आहे. इतकंच नव्हे, तर दोन ते तीन हजार रुपये खर्च केलेली मुलेदेखील आमच्या निदर्शनास आली आहेत. यावर नियंत्रण असायला हवे. गेम पार्लर मनोरंजनासाठी असतात; परंतु लहान मुलांना याचे भान राहत नाही. या वयात जर गेमसाठी घरात चोऱ्या करीत असतील तर हीच सवय पुढे जाऊन घातक होईल, अशी भीती पालकांना वाटणे साहजिकच आहे. शिवाय गेमच्या नादात अभ्यासावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गेम पार्लर चालकांनी याही गोष्टीची काळजी घ्यायला हवी.
- उल्हास भोईर जिल्हाध्यक्ष, कल्याण मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com