उरण शहरात कचऱ्याचे साम्राज्य
उरण शहरात कचऱ्याचे साम्राज्य
मच्छर, उंदीर, घुशींचा वावरः नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
उरण, ता. ३० (वार्ताहर) ः शहरात वरवरची सफाई केली जात असली तरी गल्लीबोलामध्ये कचरा तसाच पडून असून, उरण नगरपालिका प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी, पावसात या कचऱ्यावर रोगराई पसरवणाऱ्या मच्छर, कीटकांचा आणि उंदीर, घुशींचाही प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे.
उरण नगरपालिकेचा पसारा आनंदनगरपासून ते मोरापर्यंत असला तरी शहराचा भाग छोटासा आहे. उरण कोट नाका, उरण मच्छी मार्केट, कोळीवाडा उरण बाजारपेठ, मोहल्ला, तहसील कार्यालय, बौद्ध वाडा, आनंद नगर, लाल मैदान, पालवी हॉस्पिटल, कामठा, विमला तलाव, स्वामी विवेकानंद चौक, गांधी चौक, गणपती चौक, वाणी आणि राजपाल नाका, देऊळ आळी असा हा उरण शहराचा छोटासा परिसर आहे, परंतु यामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. उरण शहराची नगरपालिकेच्या माध्यमातून वरच्या वर सफाई केली जात आहे, मात्र शहराच्या मुख्य ठिकाणासह गल्ल्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत, मात्र याकडे नगरपालिकेच्या अधिकऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष
नगरपालिका सध्या प्रशासन चालवत आहे. त्यामुळे नगरपालिका अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने त्यांच्याकडून नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील मुख्य ठिकाणासह गल्लीबोळातील कचरा उचलून स्वछता करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. कचऱ्याचा प्रश्न नागरिकांच्या थेट आरोग्याशी जोडला असताना पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे. आपल्याच मार्जितले अधिकारी असल्याने त्यांना कोणाचे भय राहिले नाही. शहरातील कचरा लगचेच उचलला पाहिजे तसेच शहरातील समस्यांकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- संदेश ठाकूर, मनसे जिल्हाध्यक्ष
डम्पिग ग्राउंडला एकच गाडी
उरण नगरपालिकेकडून सिडकोच्या ४० किमी असणाऱ्या डम्पिग ग्राउंडला एकच गाडी घेतली जाते. त्यामुळे कचरा पुन्हा उचलून स्टोअर करायला लागतो म्हणून विलंब होतो. कचरा जिथे असेल तेथून उचलला जाईल, असे आरोग्य विभागचे हरीश तेजे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.