कापुरबावडीला मेट्रोचा अडथळा
कापूरबावडीला मेट्रोचा अडथळा
पिलरमुळे रस्त्यात मोठी कोंडी
ठाणे शहर, ता. ३० (बातमीदार) : वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी घोडबंदर मार्गावर विविध प्रकारची कामे सुरू आहेत. घोडबंदर आणि भिवंडी मार्गावर मेट्रोचे जाळे पसरवले जात आहे; मात्र मेट्रो रेल्वेसाठी कापूरबावडी नाका येथे रस्त्यात उभे केलेले मेट्रोचे पिलर वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. हे पिलर उभे करताना नियोजन चुकल्याने त्याचा फटका घोडबंदर, भिवंडी, नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बसत आहे. भविष्यातही कोंडीत मोठी भर पडणार असून, हे ठिकाण कोंडी करणारे ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ठाणे शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. घोडबंदर मार्गावर नवे ठाणे निर्माण होत आहे. कशेळी, भिवंडी परिसरसुद्धा झपाट्याने विकसित होत आहे. मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू असल्याने रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे. घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण सुरू असून, हा मार्ग सात पदरी केला जात आहे. गायमुख घाट ते माजिवडापर्यंत हे रुंदीकरण केले जात आहे. या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वाहतूक होत आहे. उरण जेएनपीटी बंदरमधून रोज-हजारोंच्या संख्येने जड अवजड, कंटेनर वाहने या मार्गाने गुजरात, पालघर, वसईकडे जातात. वाहनांची संख्या पाहता रुंद केलेले मार्गसुद्धा कमी पडत असल्याने या मार्गावर मेट्रो रेल्वेसाठी सेवारस्त्याच्या मधोमध पिलर उभे केले आहेत.
कापूरबावडी नाक्यावर घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर उभे केलेले दोन पिलर वाहतुकीच्या मार्गावर येत आहेत. तसेच या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने येथे मोठी कोंडी होत आहे. त्याचा फटका वसंत विहारकडे जाणारा मार्ग, मुंबईकडून गुजरातकडे जाणारा मार्ग, नाशिकडून गुजरातकडे जाणारा मार्ग आणि कापूरबावडी येथून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहनांना बसत आहे.
वाहतुकीला अडथळा
कशेळीमार्गे भिवंडीला जाण्यासाठी विद्यापीठासमोर मेट्रो स्थानक उभे केले असून, त्यासाठी कापूरबावडी येथे मेट्रोचे पिलर उभे केले आहेत; मात्र हे पिलरसुद्धा कोंडी करणारे ठरत आहेत. येथे असलेली धोकादायक इमारत अद्याप पाडलेली नाही. त्यामुळे इमारतीच्या कोपऱ्याचा मोठा भाग वाहतुकीला अडथळा ठरत आहे. कापूरबावडी येथून कोलशे, ब्रह्मांड आणि हिरानंदानी संकुलकडे मोठ्या प्रमाणात वाहने जात आहेत. त्यामुळे येथे रस्त्याच्या मोधोमध उभे केलेले पिलर कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. सायंकाळी या रस्त्याने काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठीही खूप जास्त वेळ लागतो. भिवंडी कशेळीकडून येणाऱ्या वाहनांची कापूरबावडी येथील सी पी गोयंका स्कूलसमोर मोठी कोंडी होते.
कापूरबावडी हा भाग माजिवडा उपवाहतूक विभागाच्या हद्दीत येतो. या ठिकाणी मोठे जंक्शन असल्याने या ठिकाणी वाहतूक नियोजनावर मोठा भार येतो; मात्र वाहतूक विभागाकडून दिवसरात्र बंदोबस्त ठेवून त्याचे नियोजन केले जाते. काही ठिकाणी मेट्रोच्या पिलरमुळे रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी वापरता येत नाही, परंतु ही जागाही वापरात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे आयुक्तालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.