शास्ती माफीला मुदत वाढ दया.
शास्ती माफीला मुदत वाढ द्या
कॉलनी फोरमची आयुक्तांकडे मागणी
पनवेल, ता. ३० (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करावरील शास्ती माफी योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पनवेल कॉलनी फोरमतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी अद्याप कर भरणा केलेला नाही. आर्थिक अडचणींमुळे कर भरू न शकलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. माजी नगरसेविका लीना गरड यांच्या नेतृत्वाखाली ५० लोकांच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या वेळी न्यायप्रविष्ट आणि नगरविकास विभागाच्या निर्णयासाठी प्रलंबित असलेल्या १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करण्याचा आग्रह सोडून द्यावा, तसेच त्यानंतरच्या तीन आर्थिक वर्षांचा मालमत्ता कर वेगळा दाखवून ९० टक्के शास्ती माफीची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची विनंती केली. तसेच नागरिकांकडे जेवढी पात्रता आहे तेवढ्या रकमेवरच शास्ती माफी लावून मालमत्ता कर भरून घ्यावा. याबाबत आयुक्तांनी पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय देण्याचे आश्वासन दिलेले आहे. तोपर्यंत कॉलनी फोरमच्या वतीने न्यायप्रविष्ट आणि नगरविकास विभागाच्या निर्णयासाठी प्रलंबित असलेल्या कालावधीचा मालमत्ता कर कोणीही भरू नये, असे आवाहन करण्यात आले. शिष्टमंडळामध्ये कॉलनी फोरमचे मुख्य समन्वय मधू पाटील, कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव, कार्याध्यक्ष समाधान काशीद, शहर संघटक अरुण जाधव, अनिल पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत खरात आदी पदाधिकारी आणि खारघरमधून मुख्य समन्वयक बालेश भोजने, अनिता भोसले असे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.