चांदिवलीतील समस्‍यांवर सकारात्‍मक चर्चा

चांदिवलीतील समस्‍यांवर सकारात्‍मक चर्चा

Published on

चांदिवलीतील समस्‍यांवर सकारात्‍मक चर्चा
पालिकेच्या एल विभाग कार्यालयात बैठक
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) ः चांदिवली विभागातील विविध समस्यांबाबत एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर, घनकचरा व्यवस्थापनचे सहाय्यक अभियंता अनिल बडदे यांच्या दालनात बैठक झाली. भाजपचे माजी नगरसेवक तथा चांदिवली विधानसभा संयोजक प्रकाश मोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या वेळी विविध समस्‍यांवर सकारात्‍मक चर्चा झाली.
या बैठकीत असल्फा मेट्रो स्टेशन ते परेरावाडी, परेरावाडी ते लक्ष्मीनारायण मंदिर रोड, तुकाराम ब्रिज ते खैरानी रोड, शिवप्रेमी नगर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून, याचा नाहक त्रास येथील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे. श्री गणरायाच्या आगमनाआधी विभागातील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशा मागणीचे निवेदन या वेळी देण्यात आले. परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी तुकाराम ब्रिज ते शिवप्रेमी येथील रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. तुकाराम ब्रिज ते शिवप्रेमी येथील जीर्ण संरक्षण भिंतीची तत्काळ पुनर्बांधणी करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली.
असल्फा मेट्रो स्टेशन ते बर्नार्ड मार्केटपर्यंत तब्‍बल नऊ ते १० अनधिकृत गेस्ट हाउस आहेत. त्याच्या आजूबाजूला लागून शाळा आहेत. या गेस्ट हाउसमध्ये गैरव्यवहार सुरू असल्‍याचा आरोप होत आहे. त्‍यामुळे येथील गेस्‍ट हाउसवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रांशु दीक्षित, असल्फा मंडळ अध्यक्ष प्राजक्ता मौर्या, पवई मंडळ अध्यक्ष महेश चौगुले, असल्फा विधानसभा महामंत्री नितीन कांबळे, असल्फा मंडळ उपाध्यक्ष पांडुरंग म्हसकर, विधानसभा माजी महामंत्री रेश्मा चौगुले, वॉर्ड अध्यक्ष १५९ तानाजी कवर, गुजराती सेल वॉर्ड अध्यक्ष १५९ राकेश उपाध्याय, युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष अभिषेक सिंह आदी उपस्थित होते.

झोपडपट्टी विभाग
प्रभाग क्रमांक १५९ मध्ये ८० ते ९० हजार लोकवस्ती असून, झोपडपट्टी विभाग आहे. मोहिली व्हिलेज येथील पालिकेच्या शाळेलगतचा कचरा उचलावा, कै. आनंदीबाई सुर्वे उद्यानातील सुरक्षा रक्षकाची संख्या वाढवावी, तुकाराम ब्रिजचे काम जलद गतीने पूर्ण करावे, पाणीप्रश्नावरदेखील चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com