अपघातांच्या २७ ठिकाणांवर नजर
अपघातांच्या २७ ठिकाणांवर नजर
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात विविध उपक्रम
वंसत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता.३१ ः नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीतील रस्ते अपघातांमध्ये होणारी वाढती जीवितहानी रोखण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने पुढाकार घेतला आहे. आपल्या हद्दीतील अपघातप्रवण क्षेत्रात वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले जात आहेत. त्याचबरोबर वाहनचालकांच्या प्रबोधनासाठी ९५० पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत.
नवी मुंबईचा झपाट्याने विकास झाला आहे. ५० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातून पनवेल, उरणकडे जाणाऱ्या पनवेल-सायन, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग त्याचबरोबर जेएनपीए आणि मुंबई-गोवा महामार्ग जातो. याशिवाय ठाणे-बेलापूर मार्गसुद्धा आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. महामार्गांवर २७ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभाग, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एकत्रितरीत्या विविध उपाययोजना करणार आहे.
----------------------------------
अपघातांची प्रमुख कारणे
- भरधाव वेग, लेन कटिंग, टायर फुटणे, मद्यपान करून वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर टाळणे, तसेच वाहनांवरील ताबा सुटणे, पहाटेच्या वेळी वाहन चालवताना डुलकी लागणे अशा चुकांमुळे अपघात घडतात.
- जागेवरील वळण, मोठा उतार, बाजूला कठडे नसणे, पथदिव्यांचा अभाव, सूचना फलक नसणे, महामार्ग क्रॉसिंग अशा विविध बाबी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
---------------------------------------------
महामार्गावरील त्रुटी
महामार्गावर खड्डे, धोक्याच्या सूचना देणारे फलक, महत्त्वाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर, रम्बलर, वेग मर्यादेचे बोर्ड, अपघातप्रवण क्षेत्राजवळ संरक्षण कठडे बांधणे, तसेच ब्लिंकर्ससह इतर उपाययोजना करणे.
----------------------------------------
अपघाताची क्षेत्रे
- वाशी खाडीपूल दोन्ही मार्गिका
- वाशी गाव सिग्नल दोन्ही मार्गिका
- कांदा-बटाटा गेट ते आरेंजा सिग्नल
- अन्नपूर्णा ते माथाडी सिग्नल
- सानपाडा पूल
- एलपी उड्डाणपूल
- उरणफाटा पूल
- तुर्भे स्टोअर
- तुर्भे नाका
- शरयू शोरूम
- सारसोळे सिग्नल
- आखर सिग्नल
- टी. एस. चाणक्य सिग्नल
- मोराज मंडळ
- मुंबई ते पुणे रस्ता, हिरानंदानी पूल, सेक्टर ८, खारघर
- पुणे ते मुंबई रस्ता, खारघर टोलनाका ते कोपरा पूल, सेक्टर १०, खारघर
- आसूडगाव
- कामोठे पूल
- कळंबोली सर्कल
- कळंबोली कॉलनी पूल
- खिडूकपाडा
- रोडपाली चौक
- नावडा फाटा
- पळस्पे ते जेएनपीए लेन, कुंदेवहाळ
- जुना मुंबई-पुणे महामार्ग, कोळखे
- शिवशंभो नाका सिग्नल
- चांदणी चौक, जेएनपीए
------------------------------------
नवी मुंबई परिसरातील महामार्गावर अपघात होण्याची विविध ठिकाणे शोधण्यात आली आहेत. संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. शासकीय विभागाच्या सहकार्यातून विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- तिरुपती काकडे, उपायुक्त वाहतूक, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.