नवी मुंबई महापालिकेची डिजिटल जलक्रांती

नवी मुंबई महापालिकेची डिजिटल जलक्रांती

Published on

नवी मुंबई महापालिकेची डिजिटल जलक्रांती
पाणी कर आता ऑनलाइन भरण्याचे आवाहन
वाशी, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने शहराच्या डिजिटायझेशनमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकत पाणी कर ऑनलाइन भरण्याची सुविधा नागरिकांसाठी सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पाणी कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करणे असा आहे. यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता शंकर जाधव आणि त्यांच्या टीमद्वारे व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या जनजागृतीसाठी पालिकेने सोशल मीडिया ऑडिओ क्लिप, एनएनएमटी बसमधील घोषणा, ट्राफिक सिग्नल्स आणि विविध माध्यमांतून सूचनांचा प्रचार सुरू केला आहे. नागरिकांना चार मुख्य ऑनलाइन पर्यायांद्वारे पाणी कर भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सर्व सुविधा वापरण्यास सोप्या असून, नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. वेळ, ऊर्जा वाचवण्याबरोबरच व्यवहार अधिक सुरक्षित आणि कागदविरहित बनण्यास मदत होणार आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन सेवा वापरल्यास नागरिकांची गैरसोय टळणार असून, भविष्यातील सेवा आणखी स्मार्ट, संगणकीकृत आणि सुटसुटीत करण्याचा निर्धार आहे.
...........
नवी मुंबईकरांनी पाणी कर भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा. कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ग्राहकांची वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचतील. या सुविधेमुळे व्यवहार सुरक्षित आणि पारदर्शक राहतात, असे महापालिकेचे शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com