काॉलम

काॉलम
Published on

आज वसईत ‘श्रावण रंग’ कार्यक्रम
वसई (बातमीदार) : वसई-विरार महापालिका, प्रभाग समिती ‘एच’ नवघर आणि डॉ. के. ब. हेडगेवार सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावण रंग’ या कविता आणि मराठी-हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता. ३) सायंकाळी ६ वाजता वसई माणिकपूर येथील वाय. एम. सी. ए. सभागृहात करण्यात आले आहे. कवी वैभव जोशी कविता सादर करतील, तर हृषिकेश रानडे आणि शरयू दाते गाणी सादर करतील. अमर ओक, अभिजित भदे, विक्रम भट, निनाद सोलापूरकर आणि दर्शना जोग साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करतील. पालिकेतर्फे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
पहिल्या एसएससी तुकडीचा सुवर्ण स्नेहमेळावा
विरार (बातमीदार) : होळी येथील सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट हायस्कूलच्या दहावी एसएससीच्या पहिल्या (१९७४-७५) तुकडीचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा नुकताच चुळणे, सांडोर येथील रुबी बॅन्क्वेटमध्ये उत्साहात पार पडला. शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी २२ माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी वसई व मुंबईहून सहभागी झाले होते. अधिकारी, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करून निवृत्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने हा मेळावा विशेष ठरला. कार्यक्रमाची सुरुवात सेलीन गोन्सालविस यांच्या स्वागताने झाली. आयोजक फ्रान्सिस डिकोस्टा यांनी प्रास्ताविक केले. सिल्विया परेरा यांनी दिवंगत शिक्षक आणि सहविद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सर्वांनी शालेय जीवनातील आठवणी कथन केल्या. हास्यविनोद, गायन आणि खेळांनी मेळाव्याला रंगत आणली. कार्यक्रमानंतर सर्वांनी हयात असलेले मराठी शिक्षक फ्रँकलीन डायस (वय ९३) यांना भेटून संवाद साधला. या मेळाव्याच्या यशासाठी फ्रान्सिस डिकोस्टा, सेलीन गोन्सालविस, रुक्साना डायस, लीना गोन्सालविस यांनी विशेष परिश्रम घेतले.
---
ज्ञानभारती ट्रस्टच्या प्रभारी चेअरमनपदी भरत राजपूत
बोर्डी (बातमीदार) : ज्ञानभारती ट्रस्टच्या संचालक सदस्य भरत राजपूत यांची प्रभारी चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे ट्रस्टच्या कार्यात नवचैतन्य येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ही घोषणा करंदीकर महाविद्यालयाच्या ज्ञानदीप सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्‍घाटन संस्थेचे अध्यक्ष बोमन इराणी यांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राजपूत यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रुपेश गायकर अध्यक्षस्थानी होते. भरत राजपूत यांनी प्रभारी चेअरमनपदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानत संस्थेच्या विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक जगदीश राजपूत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, माजी तालुकाध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्ष रमेश काकड आदी उपस्थित होते.
---
ब्रह्मकुमारींकडून अध्यात्मिक रक्षाबंधनाचा सोहळा
वाणगाव (बातमीदार) : गुरुकुल शिक्षण संकुलात बोईसर येथील ब्रह्मकुमारींनी हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांना राख्या बांधून अध्यात्मिक पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमात राजयोग केंद्र पतंजलीचे शशिकांत सिंग यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रता, मन स्थिरता आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी अध्यात्माचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर अध्यात्मिक ज्ञान आत्मसात केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. ब्रह्मकुमारी हिरल दीदी यांनी रक्षाबंधनाचा खरा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, हा सण फक्त कच्च्या धाग्याचा नसून निस्वार्थ प्रेम, सुरक्षेची जबाबदारी आणि त्यागाचे प्रतीक आहे. या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, वित्त संचालक लुमेश देसाई, डॉ. संकेत धाराशिवकर, प्राचार्य सोनालिका पाटील, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com