कॅप्टन ओक हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण

कॅप्टन ओक हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण

Published on

कॅप्टन ओक हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण
कल्याण, ता. १ : बालक मंदिर संस्थेच्या कॅप्टन ओक हायस्कूलमधील कलाशिक्षक कैलास यादव सरोदे या वर्षी २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले. त्यांनी शाळेत उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांनी आपल्या सेवाकाळात अनेक स्पर्धा व उपक्रम राबविले. गेल्या वर्षी सेवापूर्तीच्या अखेरच्या वर्षातही त्यांनी अनेक उपक्रम व स्पर्धा राबविल्या. त्यापैकी ‘संवाद कृषिपुत्राशी’, ‘माॅन्टेरिया व्हिलेज’ शैक्षणिक सहलीवर आधारित वृत्तांत लेखन स्पर्धा, ‘भित्तीचित्र’ चित्रकला स्पर्धा व ‘टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणे’ या अनोख्या स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी (ता. ३०) पार पडला. या बक्षीस समारंभाला संस्थेचे सहकार्यवाह प्रसाद मराठे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून गजानन विद्यालयाच्या कांचन भालेराव उपस्थित होत्या. मराठे, भालेराव आणि मुख्याध्यापक दिलीप तडवी यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

शाळेतील ३९ बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. तसेच स्पर्धांना परीक्षक व विशेष सहकार्य केले म्हणून पांडुरंग भारती, देवेंद्र कापसे, रमाकांत सोनवणे, मनीषा जाधव, रंजना बावस्कर यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ‘पाॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या मिलिंद खळदकर व ‘माॅन्टेरिया व्हिलेज’ शैक्षणिक सहलीवर आधारित उत्स्फूर्तपणे लेखन केलेल्या रूपाली कोंडेजकर यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

शाळेचे मुख्याध्यापक दिलीप तडवी यांनी म्हटले, की सरोदे हे सेवानिवृत्तीनंतरही शाळेत येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी रिक्त तासिका घेऊन ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत; यासाठी सरोदे यांचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. तर सरोदे यांनी म्हटले, की मी शेतमजुराचा मुलगा आहे. मी खूप दुःख, वेदना भोगून इथपर्यंत आलो आहे. शाळा व संस्थेने मला खूप काही दिले आहे. याची जाणीव ठेवून मी शाळा, विद्यार्थी व संस्थेसाठी काम करीत आहे.

कांचन भालेराव म्हणाल्या, सरोदे सेवानिवृत्तीनंतरही शाळेत येत आहेत. ही शाळा व संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर प्रसाद मराठे यांनी सरोदे यांचे कौतुक केले. सेवानिवृत्तीनंतर आजही आम्हाला सरोदे तेच आहेत असे वाटते. शाळेतर्फे सरोदे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कैलास सरोदे यांच्या स्पर्धा उपक्रमांना मुख्याध्यापक दिलीप तडवी, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तम गायकवाड, बाळकृष्ण शिंदे, अमिता पाठक यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. तसेच इतर शिक्षकांचेही नेहमीच सहकार्य लाभले आहे, असे सरोदे यांनी आवर्जून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com