मुंबई
रिपब्लिकन पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी अविनाश कांबळे
रिपब्लिकन पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी अविनाश कांबळे
घाटकोपर, ता. ५ (बातमीदार) ः रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांची निवड करण्यात आली. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या बैठकीत आठवले यांच्या उपस्थितीत अविनाश कांबळे यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या वेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.