आठवडी बाजारातील कचरा बनतोय डोकेदुखी

आठवडी बाजारातील कचरा बनतोय डोकेदुखी

Published on

आठवडी बाजारातील कचरा बनतोय डोकेदुखी
सानपाड्यात स्वच्छतेचा बोजवारा, आरोग्य धोक्यात
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) ः नवी मुंबईतील विविध भागांमध्ये भरणारे आठवडी बाजार नागरिकांसाठी उपयुक्त असले तरी, स्वच्छतेच्या दृष्टीने हे बाजार डोकेदुखी ठरत आहेत. सानपाडा सेक्टर ५ मधील सोमवारी भरणारा आठवडी बाजार हे त्याचे ठळक उदाहरण असून, बाजार संपल्यानंतर उरलेला कचरा तसाच रस्त्यावर टाकून विक्रेते निघून जातात. परिणामी दुसऱ्या दिवशी सकाळपासून रस्ते व फूटपाथवर सडलेला भाजीपाला, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि इतर कचऱ्यामुळे परिसर बकाल होत असून दुर्गंधी पसरत आहे. त्‍यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून सानपाड्यात सोमवारी आठवडी बाजार भरत आहे. या बाजारमध्ये स्‍वतामध्ये भाजीपालासह अनेक घरगुती वस्‍तू मिळतात. त्‍यामुळे त्‍याला मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र बाजारानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते. याशिवाय पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डास आणि माशांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अनेक विक्रेते कचऱ्याचे वर्गीकरण करत नाहीत, तसेच कचरा एका ठिकाणी संकलित न करता तो उघड्यावर फेकतात. त्यामुळे मोकाट जनावरे त्या कचऱ्याचा फडशा पाडून त्याला परिसरात पसरवतात. नवी मुंबई महापालिका स्वच्छतेसाठी अनेक उपाययोजना राबवत असली, तरी आठवडी बाजारातील कचरा व्यवस्थापनाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com