बचतगटातील महिलांना‘उमेद’चे पाठबळ
बचतगटातील महिलांना‘उमेद’चे पाठबळ
पेण तालुक्यात साकारल्या १ लाख गणेशमूर्ती, २२८ महिलांचा सहभाग
अलिबाग, ता.६ (वार्ताहर)ः पेण तालुक्यातील बचतगटातील २२८ महिलांनी उमेद अभियानाअंतर्गत गणेशमूर्ती व्यवसाय सुरू केला आहे. या अतंर्गत १ लाख ५६ हजार २० गणेशमूर्ती साकारल्या असून कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश-विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणेशमूर्तींना स्वतची खास ओळख प्राप्त झाली आहे. येथील गणपती मूर्तींना गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात आता पेण तालुक्यातील महिला बचतगट देखील उतरले आहेत. ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत पेण तालुक्यातील विविध बचतगटातील २२८ महिलांनी जवळपास १ हजार ५०० गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या आहेत.
------------------------
बँकांमार्फत पतपुरवठा
व्यवसायासाठी उमेद अभियानामार्फत महिला बचतगटांना फिरता निधी तसेच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी, बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी बचतगटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला शक्ती गणेशमूर्ती व्यवसायात गरुडझेप घेऊ शकली आहे.
---------------------------------
समस्या सोडविण्यावर भर
बचतगटातील महिला तयार करीत असलेल्या गणेशमूर्तींची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हाधिकारी जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी नुकतीच केली. या व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. यावेळी महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.