खंडाळा घाटातून खोपोलीत घुसखोरी
खालापूर, ता. ९ (बातमीदार)ः खंडाळा घाटातून जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून खोपोलीत उतरण्यासाठी अनेकदा वाहने शॉर्टकट घेतात. हाइट बॅरियर आल्याने एका वाहनाच्या धडकेत लोखंडी बॅरियर जमीनदोस्त झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खंडाळा घाटात जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जातो. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी हाइट बॅरियर बसवण्यात आले आहेत. घाटातून थेट खोपोली गावात उतरण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने वाहनचालक अनेकदा नियम धाब्यावर बसवतात; पण हा मार्ग अवघड वळणांचा असल्याने अनेकदा अपघातही होतात. गेल्या वर्षी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळली होती. या अपघातात १३ जणांना जीव गमवावा लागला होता. तर २८ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे मोठ्या वाहनांना प्रवेश निषिद्ध असताना अनेकजण नियम पायदळी तुडवतात.
----------------------------
अडीच मीटरची मर्यादा
हलक्या वाहनांना या मार्गाचा वापर करता येतो. अडीच मीटर उंचीची मर्यादा असताना पिकअप चालक, मालवाहतूक करणारे टेम्पो शॉर्टकटसाठी धोकादायक मार्गांचा वापर करतात. गेल्या वर्षी तुटलेल्या बॅरियरच्या जागी क्राँक्रीटचा भक्कम पाया करून पोलादी बॅरियर बसवण्यात आले आहेत; पण शुक्रवारी पहाटे बॅरियर कोसळल्याचे पोलिसांना दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.