भाजपाच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपाच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

भाजपच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंडित पाटील सज्ज
रोहा, ता. १० (बातमीदार) ः रोहा येथील शासकीय विश्रामगृहात भाजपच्या वतीने आयोजित जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार सुभाष (पंडित) पाटील यांनी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलवण्याचा अधिकार नसला तरी जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा अधिकार आहे. आपण आता आमदार नाही, पण माझी नाळ जनतेशी जोडलेली आहे. सर्व प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
यादरम्यान, तालुक्यातील अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले. गोपाळवट, कुडली, आंबिवलीसारख्या भागात एसटीसेवा नसणे, अपुरा व अनियमित विजपुरवठा, जादा वीजबिले, देवकान्हे आदिवासीवाडीचा रस्ता, पुरवठा विभागातील अनागोंदी, कोकबन प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, अदाणी रेल्वे प्रकल्पात शेतकऱ्यांना विश्वासात न घेणे, धाटाव औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण, स्थानिकांना रोजगार आणि सीएसआर निधीचे योग्य वाटप यासारख्या तक्रारी नागरिकांनी लेखी व तोंडी स्वरूपात मांडल्या.
या कार्यक्रमाला राजेश सानप, नितीन तेंडुलकर, जितेंद्र जोशी, लियाकत खोत, रोशन चाफेकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रिया कासार यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो नागरिक उपस्थित होते. माजी आमदार पाटील यांनी सांगितले की, खासदार धैर्यशील पाटील व पेणचे आमदार रवी पाटील यांच्या माध्यमातून आणि गरज पडल्यास संबंधित मंत्र्यांकडून, हे प्रश्न सोडवले जातील. भविष्यातही असे जनता दरबार घेऊन सामान्यांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com