शाडूच्या मूर्तींकडे वाढला कल

शाडूच्या मूर्तींकडे वाढला कल

Published on

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १० : शहरातील जवळपास ८० वर्षे जुना व ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा कारखाना असलेल्या श्री गणेश चित्रकला मंदिरातील गणपती बाप्पांना कोरोनानंतर पुन्हा परदेशात मागणी वाढली आहे. परदेशातील अनेक भाविकांनी बाप्पाच्या मूर्तींना पसंती दर्शवली आहे. दोन महिन्यांपूर्वीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील बंदी उठवल्याने रात्रंदिवस काम करून मूर्तिकार रेखीव डोळे आणि प्रभावी मूर्ती घडवत आहेत. यंदा शाडूच्या मूर्तींकडे भाविकांचा कल वाढल्याने हजारो मूर्ती घडवल्याची माहिती विश्वस्त उल्हास आंबवणे यांनी दिली.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष मनोहर आंबवणे यांचे वडील व उद्योजक हरिश्चंद्र आंबवणे यांनी श्री गणेश चित्रकला मंदिर हा कारखाना सुरू केला. तेव्हा हा कारखाना माणिक सोनारचा कारखाना म्हणून ओळखला जायचा. अगदी १०० मूर्तींपासून सुरू केलेल्या या कारखान्यात आता चौथी पिढी मूर्ती घडवत आहेत. चौथ्या पिढीतील समीर आंबवणे व सागर आंबवणे हे मूर्ती घडवतात. उल्हास आंबवणे यांनी यंदा आठ इंचापासून ते अगदी दहा फुटांपर्यंतच्या तीन ते साडेतीन हजार मूर्ती घडवल्या आहेत. यात जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त शाडूच्या गणेशमूर्ती आहेत.
सरकारने प्लास्टर ऑफ पॅॅरिसच्या मूर्तींवरील बंदी हटवल्यानंतर मोठ्या आकाराच्या आणि गणेशोत्सव मंडळाच्या मागणीनुसार दोन महिन्यांत रात्रंदिवस मेहनत करून दीड हजार पीओपीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. गणपती, गौराईनंतर नवरात्री आणि माघी गणेशोत्सव असे बाराही महिने मूर्तींची घडण येथे होत असते. ऐन मोसमात या ठिकाणी २८ ते ३० कामगार असतात, तर बाराही महिने १० कामगार चित्रकला मंदिर सांभाळतात.


पारंपरिक पोशाखातील मूर्तींना पसंती
गेल्या काही वर्षांत पारंपरिक पोशाखातील बाप्पाच्या मूर्तींना जास्त पसंती मिळत आहे. पितांबर, शेला, फेटा आणि शाल या पोशाखातील मूर्तींना यंदाही मोठी मागणी असून, जवळपास एक हजार अशा मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

मूर्ती घडवताना मूर्तीचे डोळे आणि रंगकामावर विशेष लक्ष दिले जाते. यासाठी अनुभवी कलाकार अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कला मंदिराला मिळालेले लौकिक हे येथील कारागिरांमुळे मिळाले आहे. प्रत्येक कारागीर कुटुंबातील एक भाग आहे.
- उल्हास आंबवणे, विश्वस्त,
श्री गणेश चित्रकला मंदिर

अनेक वर्षांपासून चित्रकला मंदिरात घडणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना आमच्या घरी करत आहोत. कामानिमित्त दुबईला असतो; मात्र वर्षातून फक्त गणेशोत्सवाला बदलापुरात येतो. परदेशात असलो, तरी मागणीनुसार या ठिकाणाहून गणेशाची मूर्ती घडवून दिली जाते. इतक्या वर्षाचा विश्वास त्यांनी जपला आहे.
- प्रथमेश म्हसकर, भाविक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com