ट्रॉमा केअर सेंटर उभारणीकडे शासनाचे दुर्लक्ष

ट्रॉमा केअर सेंटर उभारणीकडे शासनाचे दुर्लक्ष

Published on

संकटकाळात अपघातग्रस्त वाऱ्यावर
माणगावातील ट्रॉमा केअर सेंटर उभारणीकडे दुर्लक्ष
माणगाव, ता. १० (बातमीदार)ः रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या शहरातून मुंबई-गोवा आणि दिघी-पुणे असे महत्त्वाचे महामार्ग जातात, पण आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघात झाल्यास रुग्णाला उपचार मिळत नसल्याने ट्रामा सेंटर उभारणीची मागणी तीन वर्षांनंतरही पूर्ण झाली नसल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
मुंबई-गोवा व दिघी-पुणे अशा महत्त्वाच्या राज्यमार्गावर अनेक वेळा विविध अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे, पण शासनाला मुहूर्त सापडत नसल्याने ही घोषणा कागदावर राहिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, माणगाव शहरात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. दक्षिण रायगडसह नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येतात, पण आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघात झाल्यास रुग्णाला आवश्यक लागणारे संपूर्ण उपचार येथे मिळत नाहीत. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबई किंवा पुणे येथे जावे लागते.
------------------------------
सहा महिन्यांत १८ अपघाती मुत्यू
मुंबई-गोवा आणि दिघी-पुणे असे महत्त्वाचे महामार्ग असल्याने या परिसरात वांरवार अपघात होतात. गेल्या सहा महिन्यांत माणगाव पोलिस ठाणे हद्दीत जवळपास ४३ अपघातांची नोंद आहे. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
------------------------------------
ट्रॉमा केअर सेंटरची सद्यःस्थिती
- माणगाव उपजिल्हा रुग्णालयालगत ३४ गुंठे जागा
- १० खाटांचे लेवल ३ चे केंद्र
- स्त्री-पुरुष स्वतंत्र कक्ष
- अतिदक्षता, शस्त्रक्रिया, अपघात, डायलसेस, शवविच्छेदन, प्रयोगशाळा
- अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय
- २४ फेबुवारी २०२२ ला सार्वजनिक आरोग्य विभागाची मंजुरी
---------------------------
श्रीवर्धन, हरेश्वर, महाड, पोलादपूर येथील रुग्ण माणगाव येथे उपचारांसाठी येतात. अपघातग्रस्त रुग्णदेखील मोठ्या प्रमाणात असतात. मात्रस त्यांना प्राथमिक उपचार करून मुंबई-पुणे येथे पाठवले जात. यासाठी माणगावमध्ये ट्रॉमा केअर सेंटर गरजेचे आहे.
- रणधीर कनोजे, माजी ग्रामपंचायत सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com