मुंबई
समुद्रात बुडून एकाचा मृत्यू
समुद्रात बुडून एकाचा मृत्यू
श्रीवर्धन, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील आरावी येथील समुद्रात बुडून सचिन काशिनाथ होडबे (वय ४३, रा. बोरिवली) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ९) घडली. आरावी येथील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी पाच वाजता एक व्यक्ती मृतावस्थेत नागरिकांना वाळूत आढळून आली. येथील अमोल पुसाळकर यांनी श्रीवर्धन पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान त्यांच्याकडे आधार कार्ड मिळाल्याने त्यांची ओळख पटली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होडबे हे पाण्यात पोहायला गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. श्वास गुदमरल्यामुळे हृदय आणि श्वसनक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.