सेवानिवृत्त वाहकाचा हळद लागवडीकडे कल

सेवानिवृत्त वाहकाचा हळद लागवडीकडे कल

Published on

किन्हवली, ता. ११ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील टेंभुर्ली गावातील परिवहन मंडळातील सेवानिवृत्त बसवाहक काशिनाथ चौधरी यांनी शेतीकडे वळत हळद लागवडीचा प्रयोग केला आहे. आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या या पिकातून त्यांना लवकरच आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा असून, नियोजनबद्ध शेतीचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

शहापूर एसटी आगारातून सेवानिवृत्त झाल्यानंतर चौधरी यांनी गावाजवळील दीड एकर शेतात साडेचार क्विंटल हळदीचे बियाणे एप्रिल-मे महिन्यात लावले. साधारणपणे प्रत्येक रोपातून एक ते दीड किलो हळद मिळते. संपूर्ण हंगाम पूर्ण झाल्यावर स्थानिक व्यापाऱ्यांना थोडा कमी दरात विक्री केली तरी सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पादन मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. लागवडीसाठी बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान, शेती मशागत आणि खत व्यवस्थापन यावर सुमारे दीड लाख रुपये खर्च झाला आहे. भविष्यात त्यातून साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याची शक्यता आहे. नियोजनबद्ध शेती केल्यास प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होऊ शकतो, असे चौधरी म्हणाले.

आयुर्वेदिक गुणधर्म
आयुर्वेदात हळदीचे अनेक गुणधर्म आहेत. शरीरातील दाहकता कमी करते, पचनक्रिया सुधारते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळद मदत करते. तसेच बद्धकोष्ठावरही लाभदायक ठरते.

ठिबक सिंचन फायदेशीर
उष्ण व दमट हवामान, काळीभोर माती, योग्य पाणी व खत व्यवस्थापन हळदीसाठी पोषक मानले जाते. एप्रिल ते मे महिन्यात लागवड करणे योग्य ठरते. शेणखत किंवा कंपोस्ट खताचा उपयोग केल्यास उत्पादन चांगले निघते. लागवडीच्या ठिकाणी अनावश्यक पाणीसाठा रोपासाठी धोकादायक ठरते. मातीचा वरंबा करून त्यावर लागवड करावी आणि पाण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने दोन वेळा पाणी दिल्यास रोपांना पोषक ठरते. यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

किन्हवली : हळद लागवड केलेले शेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com