मुरूडच्‍या विकासासाठी तीनशे कोटींचा निधी खर्च

मुरूडच्‍या विकासासाठी तीनशे कोटींचा निधी खर्च

Published on

मुरूडच्‍या विकासासाठी तीनशे कोटींचा निधी खर्च
आमदार महेंद्र दळवी यांची माहिती; भक्तनिवास भूमिपूजन सोहळा उत्‍साहात
मुरूड, ता. १२ (बातमीदार) ः मुरूड शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील अडीच वर्षांत तब्बल तीनशे कोटी रुपयांहून अधिक निधी विविध कामांसाठी वापरला गेला असून, आगामी काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुरूड-अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.
श्री कोटेश्वरी माता मंदिराच्या भक्तनिवास भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी सांगितले की, रस्ते, मंदिरे, शाळा, समुद्रकिनारा सुशोभीकरण, उद्याने यांसारख्या पायाभूत सुविधा प्रामाणिकपणे उभारण्यात आल्या आहेत. तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते स्व. आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून, श्री कोटेश्वर मंदिराच्या वेशीवर भव्य प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. तसेच आपल्या भाषणात आमदार दळवी यांनी मुरूडवासीयांवर विशेष प्रेम असल्याचे सांगत, ३० टक्के माझे वैयक्तिक मतदान असून, उर्वरित ७० टक्के पक्षविरहित कार्यामुळे मिळतात. आगामी काळात मतदारसंघाची पुनर्रचना झाली तरी मुरूड जिथे असेल तिथूनच मी उमेदवारी भरणार, असे स्पष्ट केले. तसेच महायुती सरकारच्या काळात पद्मदुर्ग किल्ल्याची डागडुजी व इतर विकासकामे खासदारांनी पूर्ण करावीत, असा उपरोधिक सल्ला त्यांनी अप्रत्यक्षपणे खासदार सुनील तटकरे यांना दिला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्याधिकारी सचिन बच्छाव, तहसीलदार डफळ, कोटेश्वरी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नयन कर्णिक, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, माजी नगरसेवक अशोक धुमाळ, जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, रुषीकांत डोंगरीकर, माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील, तृप्ती पाटील, दिनेश मिनमिणे, मनोहर गुरव तसेच ट्रस्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com