पेणमध्ये १९८ सार्वजनिक तर ४७० खाजगी दहीहंड्यांचा थरार
पेणमध्ये १९८ सार्वजनिक तर ४७० खासगी दहीहंड्यांचा थरार
मनसेची दहीहंडी ठरणार पेणकरांचे आकर्षण
पेण, ता. १२ (वार्ताहर) : दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून, तालुक्यातील पथकांचा सराव जोरदार सुरू आहे. यंदा तालुक्यातील पेण, दादर सागरी, वडखळ पोलिस ठाणे हद्दीत १९८ सार्वजनिक आणि ४७० खासगी अशा एकूण जवळपास ७०० च्या आसपास दहीहंड्यांचा थरार रंगणार आहे, तर मनसेची दहीहंडी पेणकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.
पेण शहरात सध्या दहीहंडीची मोठी धामधूम असून, सात ते आठ थरांच्या दहीहंड्या फोडण्यासाठी रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई, मुंबई येथून गोविंदा पथक येत असतात. हा थरार पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील आबालवृद्ध मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेण पोलिस ठाणे १२६ सार्वजनिक, २७५, वडखळ हद्दीत एक सार्वजनिक, १०० खासगी आणि दादर सागरी हद्दीत ७१ सार्वजनिक आणि ९५ खासगी अशा एकूण १९८ सार्वजनिक आणि ४७० खासगी दहीहंड्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या पुढाकाराने एक लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी पेणकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.
कायदा-सुव्यवस्था राखूनच सण साजरे करा
तालुक्यातील गोविंदा पथकांनी शासनाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन परवानगी घेऊनच उत्सव साजरा करावा. शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमधील दहीहंडी उत्सव साजरा होत असताना वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याचे भान ठेवून यासह कायदा व सुव्यवस्था राखूनच दहीहंडी उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी आयोजकांना केले आहे.
दहीहंडी हा सांस्कृतिक सण आहे. आपली संस्कृती जपत असताना कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. सण, उत्सव साजरे करताना कोणतीही धार्मिक, जातीवाचक तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेऊन आणि स्वरक्षणाचीदेखील काळजी घ्यावी आणि वेळेचे बंधन पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य करून उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा.
- जालिंदर नालकुल, पोलिस उपअधीक्षक, पेण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.