बुधवारी डोंबिवलीत पाणी नाही
डोंबिवलीत आज पाच तास पाणीपुरवठा बंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून डोंबिवली पूर्व व पश्चिम भागात बुधवारी ( ता. १३) दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. उल्हास नदीकाठी मोहिली येथील उदंचन केंद्र हे डोंबिवली शहरासाठी कच्चे पाणी उचलण्याचे मुख्य केंद्र आहे. येथे नदीतून उचललेले पाणी नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. पावसाळ्यात नदीत गाळ, पाला-पाचोळा मोठ्या प्रमाणात वाहून येतो. त्यामुळे संयंत्रे जाम होण्याची समस्या वारंवार उद्भवते. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मोहिली केंद्र तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्राचा कार्यप्रवाहही ठप्प होणार आहे आणि याचा थेट परिणाम डोंबिवलीतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
डोंबिवली शहराला उल्हास नदीकाठच्या मोहिली येथील उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी कल्याण पश्चिमेतून बैल बाजार, गोविंदवाडी, पत्रीपूल भागातून रेल्वेमार्गाखालून नेतिवली येथील टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. उल्हास नदीतून उचललेले हे कच्चे पाणी नेतिवली येथील जलजुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून मग डोंबिवली पूर्व पश्चिम शहराला त्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने उल्हास खोऱ्यात डोंगर-दऱ्यातून आलेला गाळ, पालापाचोळा नदीपात्रात वाहून येत असतो.
कल्याण पश्चिमेतील मोहिली येथे उल्हास नदीकाठी हे पाणी पालिका उचलते. हे कच्चे पाणी उदंचन केंद्रात संयंत्रातून गाळून घेताना अनेक वेळा तांत्रिक समस्या निर्माण होतात. सतत उचलण्यात येणाऱ्या पाण्यातील गाळ, पालापाचोळ्याचा निचरा करताना उदंचन केंद्रातील संयंत्रे जाम होतात. संयंत्र गाळाने जाम झाल्याने त्यांचा पाणी उचलण्याचा वेग कमी होतो. हे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी उदंचन केंद्र बंद ठेवावे लागते. मग तांत्रिक अडथळे दूर करण्याची कामे करावी लागतात. या कामासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला उल्हास नदीकाठची उदंचन केंद्रे बंद ठेवावी लागतात. ही केंद्रे बंद ठेवली की मग या केंद्रांवर अवलंबून असणारी जलशुद्धीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात. महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, बुधवारी पाणी बंद राहणार असल्याने आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच या कालावधीत पाणी अपव्यय टाळावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार
डोंबिवली पूर्व :
पाथर्ली, ठाकुर्ली, चोळेगाव, ९० फूट रोड
भोईरवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी
गोग्रासवाडी, अयोध्यानगरी, फडके रस्ता
सुनीलनगर, आयरे रोड, राजाजी पथ
म्हात्नेनगर, रेल्वेस्थानक परिसर
डोंबिवली पश्चिम :
विष्णुनगर, मोठागाव, ठाकूरवाडी, कोपर
शास्त्रीनगर, जयहिंद कॉलनी, सुभाष रस्ता
नवापाडा, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा
उमेशनगर, चिंचोड्याचापाडा, गणेशनगर
रेल्वे वसाहत व भागशाळा मैदान परिसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.