स्वप्नांसाठी कठोर परिश्रम करा
कासा (बातमीदार) : बाबुभाई पोंदा महाविद्यालयात विज्ञान शाखेला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून १९७१ च्या एसएससी बॅचचे विद्यार्थी व चांद्रयान-३ मोहिमध्ये सहभागी झालेले रवींद्र राऊत उपस्थित होते. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी कठोर परिश्रम करा, असा त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तरुण पोंदा, उपाध्यक्ष अजय बाफना, सुधीर कामत, सुनील पोंदा, राजेंद्र फाटक, प्रदीप कर्नावट, डॉ. रोहित भंसाली, आनंद नरेश बाफना, धर्मेंद्र चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या स्काऊट-गाईड पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य सोपान इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य शशिकांत चव्हाण यांनी मानले.