गोविंदा रे गोपाला...

गोविंदा रे गोपाला...

Published on

गोविंदा रे गोपाळा...
दहीहंडीसाठी नवी मुंबईकर सज्ज
वाशी, ता. १४ (बातमीदार) ः पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. ऐरोली, घणसोलीसह शहरातील विविध उपनगरात मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा होणार आहे. लाखोंच्या बक्षिसांसह दहीहंडी उत्सवातील कलाकारांची उपस्थिती, लावणी नृत्य, वाद्यवृंद, ऐतिहासिक प्रसंगाच्या सादरीकरणाने यंदाचा उत्सव अविस्मरणीय ठरणार आहे.
नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून कायम आहे. ऐरोली विभागातील दहीहंडी असलेल्या सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशनच्या दहीहंडीला ११ लाखांची बक्षिसे जाहीर केली आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते विजय चौगुले यांच्या वतीने दहीहंडी ऐरोली सेक्टर १५ मधील गणेश इच्छापूर्ती मंदिराजवळ उभारली जाणार असून, या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील, गायक राजू राठोड, अभिनेत्री अस्मिता सुर्वे, धनश्री दळवी उपस्थित राहणार आहेत. तर साईनाथ वाडी येथे शिवसेनेचे (शिंदे गट) साहिल चौगुले यांच्या पुढाकाराने १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी लावली जाणार आहे. तसेच ‘अफजल खान वध’ ऐतिहासिक प्रसंगाचे चित्रीकरणही दाखवण्यात येणार आहे.
---------------------------
लाखोंच्या बक्षिसांची घोषणा
ऐरोली सेक्टर आठ येथील विबग्योर शाळेच्या प्रांगणात, शिवसेना (शिंदे गट)चे युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या वतीने एक लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी लावली जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकांसाठी विशेष दहीहंडी होणार आहे. दिघा-इलठण पाडा परिसरातील कन्हैय्यानगर येथे अमित मिश्रा, दीपक उपाध्याय यांच्या वतीने एक लाख ११ हजार ११ रुपयांची दहीहंडी असणार आहे. घणसोली सेक्टर नऊ येथील एएसपी शाळेसमोरील मैदानात स्वराज्य पक्षाचे अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल २१ लाख रुपयांची भव्य दहीहंडी लावली जाणार आहे.
-----------------------------
जय जवान गोविंदा पथकाचे आकर्षण
सानपाडा येथे मनसेच्या वतीने चोरहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दिघा येथे शिवसेना (शिंदे गट)चे नेते जगदीश गवते यांच्या पुढाकाराने चोरहंडी लावण्यात आली. नवी मुंबईत पहिल्यांदाच जय जवान गोविंदा पथक नऊ थरांची मानवी रचना साकारणार आहे.
-----------------------
ऐरोलीत दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षिसांसह नामांकित कलाकार आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ऐरोलीतील दहीहंडी उत्सवाचा नागरिकांनी आवर्जून आनंद घ्यावा.
- विजय चौगुले, उपनेते शिवसेना (शिंदे गट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com