२१ वर्षांनंतर श्रावणातील अंगारकीचा दुर्मिळ योग

२१ वर्षांनंतर श्रावणातील अंगारकीचा दुर्मिळ योग

Published on

२१ वर्षांनंतर श्रावणातील अंगारकीचा दुर्मिळ योग
टिटवाळा, ता. १२ (वार्ताहर) : तब्बल २१ वर्षांनंतर श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आल्याने श्री सिद्धिविनायक मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच ''गणपती बाप्पा मोरया'' च्या गजरात भक्तिमय वातावरणात शहर दुमदूमून गेले होते.
पहाटे चार वाजता अभिषेक व आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. मंदिर परिसरात गर्दीची तीव्रता लक्षात घेत मंदिर ट्रस्ट व स्थानिक प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था आखण्यात आली होती. पावसाच्या शक्यतेनुसार उभारण्यात आलेले स्थायिक मंडप, प्रवेश-निर्गमन रचना, तसेच लांबून दर्शनाची रांग व्यवस्था यामुळे भाविकांना त्रास न होता सहज दर्शन मिळाले. वाहनतळ केवळ अत्यावश्यक सेवांसाठी खुला ठेवण्यात आला होता. बाकी भाविकांसाठी दूरवर तात्पुरते पार्किंगची सोय केली होती, ज्याचा सकारात्मक परिणाम झाला. सुरक्षा आणि सेवेसाठी ५० पोलिस व ३०० स्वयंसेवकांची तैनाती होती. हे स्वयंसेवक फक्त रांग व्यवस्थापन नव्हे तर पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि हरवलेले भाविक शोधणे यामध्येही सक्रिय होते. दुपारी १२ वाजता व रात्री ९.१३ वाजता झालेल्या विशेष आरत्यांनी उत्सवाचा कळस गाठला. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन सुरू असल्याने उशिरापर्यंत टिटवाळा गर्दीने फुलून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com