दहीहंडी उत्सवासाठी २५ मंडळांना मंडप परवानगी

दहीहंडी उत्सवासाठी २५ मंडळांना मंडप परवानगी

Published on

दहीहंडी उत्सवासाठी २५ मंडळांना मंडप परवानगी
मंडप उभारणीसाठी ५५ अर्ज; पालिका निवडणुकीची छाप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे शहरात विविध राजकीय व सामाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या लाखमोलाच्या हंडीतील लोणी चाखण्यासाठी ठाणे-मुंबईतील अनेक गोविंदा पथके ठाण्यात येत असतात. या उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपासाठी परवानगी घेणे अनिवार्य आहे. त्यानुसार ठाण्यात दहीहांडी मंडप उभारणीसाठी ५५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २५ अर्जांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
आगामी महापलिका निवडणुकीची छाप यंदाच्या सण-उत्सवांवर दिसून येत आहे. अशातच दहीकाला उत्सवाच्या माध्यामतून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांपासून गोविंदांची पंढरी म्हणूण ठाण्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ठाण्यासह मुंबई व इतर भागांतून गोंविदा पथके सहभागी होत असतात.

यंदा नऊ थरांपेक्षा अधिक थर लावणाऱ्यांसाठी लाखमोलाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये २१ लाखांपासून बक्षिसांची उधळण होणार आहे. त्यातही ठाण्यात टेंभीनाका येथील मानाची हंडी, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची संस्कृती प्रतिष्ठानची हंडी, संकल्प प्रतिष्ठान, स्वामी प्रतिष्ठान, निष्ठावंतांची दहीहांडी, मनसेची दहीहांडी आदींसह इतरही काही दहीहांडी उत्सव मागील काही वर्षांत नावारूपाला आले आहेत. दुसरीकडे दहीहंडी उत्सवासाठी ठाणे महापालिकेकडून मंडप परवानगीदेखील दिली जात आहे.
महापालिकेकडे आतापर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा स्वरूपात ५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. या वेळीदेखील मंडळांनी मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑफलाइन पद्धतीलाच अधिक महत्त्व दिले आहे. ऑनलाइनला अवघे सहा अर्ज प्राप्त झाले आहेत. तर महापालिकेने आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी २५ मंडळांना परवानगी दिली आहे.
..........................
प्रभाग समितीचे नाव ऑनलाइन ऑफलाइन एकूण अर्ज संख्या परवानगी दिलेली संख्या
नौपाडा - ०० - ०४ - ०४ - ०३
कोपरी विभाग - ०१ - ०४ -०५ - ००
वागळे - ०३ -०८ - ११ -०३
लोकमान्य सावरकरनगर - ०२ - ०५ - ०७ - ०३
वर्तकनगर - ०० - ११ - ११ - ०४
माजिवडा मानपाडा - ०० - ०५ - ०५ - ०६
उथळसर - ०० - ०३ - ०३ - ०२
कळवा - ०० - ०९ - ०९ - ०२
मुंब्रा - ०० - ०० - ०० -०५
दिवा - ०० - ०० - ०० -००
--------------------------
एकूण - ०६ - ४९ - ५५ - २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com