डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू कालकथित दिलिपराव मुकुंदराव आंबेडकर यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा
दिलीप आंबेडकर यांना द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे आणि मुकुंदराव आंबेडकर यांचे सुपुत्र दिलीप आंबेडकर यांचा द्वितीय स्मृतिदिन कार्यक्रम झाला. त्यांचा धार्मिक विधी मंगळवारी (ता. १२) त्यांच्या निवासस्थानी ओशिवरा येथे पार पडले.
बौद्धजन पंचायत समितीचे संस्कार विभागाचे अध्यक्ष मंगेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. दिलीप आंबेडकर यांचे वयाच्या ६५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी, १२ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले होते. या स्मृतिदिन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, राजरत्न अशोक आंबेडकर, कामगार नेते रमेश जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, संदेश जाधव, जीवन भालेराव, कुणाल तुरेराव आणि नातेवाईक व स्थानिक रहिवासी यांच्यासह दिलीप यांच्या पत्नी स्नेहा आंबेडकर, मुलगा अक्षय आंबेडकर, मुलगी अक्षता आंबेडकर यांच्या उपस्थितीत स्मृतिदिनाचा कार्यक्रम पार पडला.