‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’तर्फे विविध कार्यक्रम
‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’तर्फे विविध कार्यक्रम
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यदिन, श्रीकृष्ण जन्म आणि गोपाळकालानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी (ता. १४) राजे संभाजी मैदान, मुलुंड (पूर्व) येथे ‘पाच मिनिटे आपल्या राष्ट्रगीतासाठी माझी पाच मिनिटे आपल्या शहिदांसाठी’ हा कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, जुन्या पोस्ट ऑफिसजवळ, मुलुंड (पूर्व) येथे करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवारी (ता. १६) मुलुंड पूर्वेतील हनुमान चौक, येथे दुपारी ४ वाजल्यापासून करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील ‘खेळ मंगळागौरीचा जागर स्त्री शक्तीचा’ हा मंगळागौर सोहळा रविवारी (ता. १७) मुलुंड पूर्वेतील वामनराव मुरांजन शाळेच्या डॅफोडील हॉल येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रभक्ती, उत्सव व परंपरेचा मान राखण्यासाठी या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा मयुरा बाणावली यांनी दिली.