विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
कर्मचारी संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः पालिका कर्मचारी कामगार सेना युनियनमार्फत शिवसेना भवन सभागृहामध्ये कामगारांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला शिवसेना सचिव सुधीर साळवी व आमदार महेश सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम उपस्थित होते.
सुधीर साळवी व महेश सावंत, बाबा कदम यांनी आपल्या भाषणात कामगारांच्या पाल्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांची मुले डॉक्टर, वकील, अधिकारी झाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. पुढील गुणगौरव कार्यक्रमामध्ये कोणत्याही टक्केवारीची अट न ठेवता सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. त्यासाठी लागणारी मदत करण्यास सकारात्मकता त्यांनी दर्शविली. याप्रसंगी संघटनेच्या सरचिटणीस ॲड. रचना अग्रवाल, उपाध्यक्षा संजय कांबळे-बापेरकर, चिटणीस संजय वाघ, कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्याप्रसंगी सेनेचे सरचिटणीस सत्यवान जावकर, चिटणीस हेमंत कदम, अजय राऊत, अतुल केरकर, महेश गुरव, संदीप तांबे, वृषाली परुळेकर, मंगल तावडे, शिल्पा पोवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष रंजना नेवाळकर यांनी केले.