गुरु पंडित अजय चक्रवर्ती राज्यातील तरुण, नवोदित कलाकारांना करणार कंठसंगीताचे मार्गदर्शन
गुरू पंडित अजय चक्रवर्तींचे नवोदितांना कंठसंगीताचे मार्गदर्शन
मुंबई, ता. १३ : अभिजात भारतीय कंठसंगीताच्या प्रशिक्षणाची एक आगळीवेगळी संधी कलासाधकांसाठी आता उपलब्ध होणार आहे. श्रुतीनंदन प्रशिक्षण वर्गांअंतर्गत पद्मभूषण पंडित अजय चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी कलाकारांना मिळणार असून, हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य आहे. या उपक्रमासाठी टाटा समूहाचे सहकार्य लाभले आहे.
प्रशिक्षण वर्गांसाठी ८ ते १४ आणि १५ ते २० अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गायनाचा बंदिश, उपशास्त्रीय रचना, चित्रपटगीत अथवा सुगम संगीत प्रकार यांचा सुमारे पाच ते सात मिनिटांचा यूट्युब अनलिस्टेड व्हिडिओसोबत गुगल फाॅर्मसह अपलोड करायचा आहे. पाच सप्टेंबरपर्यंत लिंक अपलोड करण्याची मुदत असून, यामधून विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष सादरीकरण मुंबईमध्ये एनसीपीए (नॅशनल सेंटर फार परफॉर्मिंग आर्टस) येथे घेण्यात येईल.
प्रशिक्षणाचा कालावधी महिन्यातील तीन ते चार दिवस असून पुणे, मुंबईसोबतच राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग संपन्न होणार आहेत. पं. अजय चक्रवर्ती यांच्यासोबतच प्रसिद्ध गायक कलाकार असलेले पुण्याचे मेहेर परळीकर आणि आयेशा मुखर्जी हे दोघे या प्रशिक्षण वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना कनिष्ठ गुरू म्हणून मार्गदर्शन करतील. काही अपवादात्मक प्रतिभावान विद्यार्थ्यांना एक किंवा दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.