जुगार, दारू अड्ड्यांवर कारवाई
अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : अंबरनाथ पोलिसांनी शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डा आणि एका अवैध दारूविक्री अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली. यावेळी सुमारे ७० हजारांचा मुद्देमाल आणि ४३ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली. ही धडक कारवाई अंबरनाथ गुन्हे शाखा विभागाने केली.
शहरात विविध ठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याची गुप्त माहिती अंबरनाथ पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून अंबरनाथ पश्चिमेकडील तीन जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी एकूण ४० जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडून गुन्हे दाखल केले. या वेळी श्रावण बोडके (४५), विजय भोपतराव (५५), विष्णू मांदोली (३५), मुमताज अली (३३), धनुष कोंका (२९), मनोज चव्हाण (२२), जितेंद्र जयस्वाल (३८), सिद्धार्थ चंडाले (३०), राहुल राठोड (२५), धारसिंग राठोड (३१), मारुती फुले (३६), कार्तिक गणेशन (३०), प्रेम गांधी (५०), दत्तात्रय जाधव (५२), राहुल सिंग (२६), सिद्धार्थ कांबळे (४०), अरबाज शेख (१८), शोएब चौधरी, दिलीप बिरवाडकर (५१) पाथर्डी, हेमंत पारिक (४९) राकेश सिद्धांत (२८) सोहेल शेख (२८), राज महेंद्रसिंग (२१) काशिनाथ सुर्वे (४३) लक्ष्मण जंगम (३१) आयाज शेख (२१), आकाश भोसले (२१), निसार शेख (३८), परशुराम रामाघंटी (५०), अब्दुल शेख (५१), हेमंत सकपाळ (६०), अजित चौधरी (३५), संदीप मिसाळ (३८), संजय देवस्थान (३६) सय्यद नूर मोहम्मद (४२), राजकुमार गायकवाड, अखिल काझी (५५), अशोक वाघ (७२), सुरेश जाधव (५५), जमीर खान (४९), जुगार व्यवसाय चालवणाऱ्यांवर आणि गौतम यादव खरे (५५) व्यवस्थापकावर अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.